Success Story: 7 दिवसात 336 कोटींची कमाई… 12 वी नापास असूनही आहे कोट्यवधींचा मालक
यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमांची आणि संयमाची गरज असते. या दोघांचीही जर सांगड घालता आली तरच तुम्ही यशाचे शिखर गाठू शकता. आपल्या देशात आतापर्यंत अनेक जणांनी कठोर परिश्रम, संयम आणि बुद्धीचा वापर करून यश संपादन केलं आहे. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने बारावीत नापास होऊनही कोटींचा व्यवसाय उभा केला आहे.
गिरीश माथरुबूथम असे या व्यायसायिकाचे नाव आहे. गिरीश माथरुबूथम याचं शिक्षण 12 वी नापास असलं तरी आज ते कोट्यवधी रुपयांचे मालक आहे. ज्यावेळी गिरीश 12 वी नापास झाले, तेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी, मित्रमंडळींनी शिक्षणावरुन हिणवलं. ‘तू नापास झालास, त्यामुळे आता तू रिक्षा चालवं, यापलीकडे काही करु शकत नाहीस’ असे टोमणे मारले. मात्र गिरीश यांनी हार मानली नाही. कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम हैं कहना… असे म्हणत स्वत:वर विश्वास ठेवला. आणि पुढील वाटचाल सुरू ठेवली.
अथक प्रयत्नांनंतर गिरीश यांना HCL कंपनीमध्ये नोकरी मिळवली. यानंतर ते झोहो या सॉफ्टवेअर कंपनीत लीड इंजिनीअर म्हणून काम करू लागले. आयटी क्षेत्रात काम केल्यामुळे त्यांना या क्षेत्रातील बऱ्याच गोष्टीचा अनुभव घेता आला. याच अनुभवातून गिरीशने 2010 मध्ये फ्रेशवर्क्स ही आपली स्वत:ची कंपनी सुरू केली. ‘फ्रेशवर्क्स’ ही कंपनी आयटी सोल्यूशन्स पुरवते. आजच्या काळात या कंपनीचे मूल्यांकन 53000 कोटी रुपये आहे. 2010 ते 2018 या आठ वर्षाच्या काळात गिरीश यांच्या कंपनीने मोठी कमाई केली. 2018 पर्यंत, कंपनीचे 125 देशांमध्ये 100,000 पेक्षा जास्त ग्राहक होते. गिरीश यांच्याकडे सध्या फ्रेशवर्क्सचा 5.229 टक्के हिस्सा आहे. त्यांची एकूण मालमत्ता सुमारे 2,369 कोटी रुपये आहे.
गेल्या 7 दिवसात गिरीश यांनी फ्रेशवर्क्सचे शेअर्स विकून 336 कोटी रुपयांची कमाई केली आहे. फ्रेशवर्कसोबतच गिरीश यांनी SaaS (Software as a service) या व्यवसायात प्रवेश केला. या क्षेत्रातही त्यांनी प्रसिद्धी मिळवली.
SaaS व्यवसाय म्हणजे काय?
SaaS ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रदान करतात. सॉफ्टवेअर खरेदी आणि स्थापित करण्याऐवजी, कस्टमर सॉल्यूशनचा वापर करण्यासाठी सब्सक्रिप्शन घेतात. यातून अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. ज्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवणे सोपे होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List