हर्णे बंदर पर्यटकांनी फुल्ल; पापलेट, कोळंबी, सुरमई खरेदीसाठी झुंबड

हर्णे बंदर पर्यटकांनी फुल्ल; पापलेट, कोळंबी, सुरमई खरेदीसाठी झुंबड

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक शनिवारापासूनच हर्णे बंदरात दाखल झाले आहेत. सुटटी एन्जॉय करण्यासाठी आलेल्या पर्यटकांची आता हर्णे बंदरात मासळी खरेदीला गर्दी होत आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी बंदराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. पर्यटक आवर्जून ताजी मासळी व सुकी मासळी खाण्यासाठी व खरेदीसाठी हजेरी लावू लावत आहेत. यावेळेस मासळीची आवक खूपच कमी असल्याने बंदरामध्ये येणारी मासळी खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.

मिनि महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दापोलीचे थंड अल्हाददायक वातावरण, दापोली शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला केळशी ते दाभोळपर्यंतचा स्वच्छ सुंदर समुद्र किनारा आणि नारळी-फोपळीच्या बागांची सावली यामुळे पर्यटकांकडून दापोलीतील समुद्र किनाऱ्याला जबरदस्त पसंती मिळत आहे. दापोलीत दाभोळ, बुरोंडी, आडे, केळशी बंदरात मासेमारी होत असली तरी मुख्यत्वे हर्णे हे तालुक्याचे ताजी मासळी मिळण्याचे मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी सकाळ संध्याकाळ असे दिवसातून दोनदा मासळीचा लिलाव होत असतो. महाराष्ट्रभरातून पर्यटक मासळी खरेदीसाठी हर्णे बंदरात आवर्जून येतात.

थर्टी फस्टच्या निमित्ताने 2024 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तर 2025 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दापोलीतील समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या संख्येने हजर झाले आहेत. दापोलीत पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील किनारपट्टी आणि किनाऱ्यावर असणाऱ्या हॉटेल्स, रिसॉर्टमध्ये पर्यटकची प्रचंड गर्दी होत आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे हॉटेल, रिसॉर्ट हाऊसफुल्ल झाली आहेत.

दापोलीतील बंदरात ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीला सुरुवात झाली. मात्र सुरुवातीपासूनच वारंवार वादळांच्या तडाख्यांमुळे गेले दोन महिने मासळीची आवकच झाली नाही. सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापासून नौका मासेमारी करिता समुद्रामध्ये जायला लागल्या. त्यात येणाऱ्या मासळीमध्ये जेलीफिशचे प्रमाण जास्त होते तर खाण्यासाठी लागणाऱ्या मासळीचे प्रमाण खूपच कमी होते. मात्र मासेमारीसाठी दररोज जाणाऱ्या छोट्या होड्या किरकोळ मासळी आणत. त्यामुळे खवय्यांची मासळीची भुख भागत होती. दापोलीत पर्यटनासाठी येणारे हे पर्यटक खास फिरणं आणि मासळी खाणे आणि खरेदीसाठी येत असतात. येथे पश्चिम महाराष्ट्रातुन येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मासळी खाण्याचा एक वेगळाच विलक्षण आनंद असतो. दापोली तालुक्यात कोणत्याही ठिकाणी वास्तव्याला आलेला पर्यटक हर्णे बंदरामधील ताजी मासळी खाण्यासाठी येतच असतात. त्याप्रमाणे आता तालुक्यातील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्टना झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी आदी मासळीच्या चटकदार मसालेदार डिशेस खाण्यासाठी पर्यटक येथे येत आहेत. पापलेट, सुरमई, कोलंबी, बांगडा आदी प्रकारच्या मासळीला पर्यटकांची मागणी जास्त आहे.

ताज्या मासळीचे पर्यटकांना विशेष आकर्षण वाटते. मोठी सुरमई किंवा पापलेट असेल तर त्यांना हातात घेऊन फोटो काढण्याचा मोह अजिबात आवरतच नाही. मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरूवार संपताच हर्णे बंदरात पर्यटकांचीच मासळी खरेदीसाठी तुफान गर्दी दिसत आहे. या गर्दीमुळे बंदरामध्ये एक प्रकारची जत्रा असल्यासारखं वातावरण निर्माण झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शशांक केतकर दुसऱ्यांदा होणार बाबा; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘गुड न्यूज’! शशांक केतकर दुसऱ्यांदा होणार बाबा; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘गुड न्यूज’!
अभिनेता शशांक केतकरने 2025 या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शशांक पुन्हा एकदा बाबा होणार आहे....
काय ते थर्ड क्लास…; ‘बिग बॉस’बद्दल प्रश्न विचारणाऱ्यावर भडकला गश्मीर महाजनी
एका मेसेजमुळे सुरु झाली होती प्रियांका-निकची प्रेमकहाणी; नात्याची सुरुवात फारच हटके, इंट्रेस्टींग लव्हस्टोरी
अनुराग कश्यपने बॉलिवूड इंडस्ट्रीची काढली अक्कल; घेतला मोठा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणणार, हस्तांतरण प्रक्रियेला वेग
गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरनं हॉर्न वाजवला अन् मोठा राडा झाला; जळगावमधील पाळधीत दगडफेक, जाळपोळ आणि संचारबंदी
कौटुंबिक वाद विकोपाला गेला; सख्ख्या भावानंच काढला चार बहिणी आणि आईचा काटा