हिंदुस्थानवर दबाव वाढवण्यासाठी विराट टार्गेट; रवी शास्त्रीनी ऑस्ट्रेलियन्स मीडियाला सुनावले
ऑस्ट्रेलियन संघात पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टसला खांद्याने धडक दिल्याच्या प्रकरणाचा वापर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी विराट कोहलीला टार्गेट करण्यासाठी करत आहे. मीडियाच्या प्रतिक्रियांमधून ऑस्ट्रेलियन संघावर बॉर्डर-गावसकर (बॉगाक) ट्रॉफी जिंकण्याचा दबाव दिसून येत आहे. दोन्ही संघांवर चांगली कामगिरी करण्याचे दडपण आहे, असे मत हिंदुस्थानचे माजी मुख्य प्रशिक्षक, समालोचक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
बॉर्डर-गावसकर करंडक च्या एमसीजी कसोटीत नवख्या सॅम कॉनस्टसने चांगली सुरुवात करून दिली. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहालासुद्धा सोडले नाही. असे असताना विराटने जाणूनबुजून कॉनस्टसला धक्का दिला. ऑस्ट्रलियाच्या डावातील 11 व्या षटकाच्या ब्रेकदरम्यान हे प्रकरण घडलं. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या प्रकरणाची गंभीर दखल आयसीसीने घेतली. विराटला सामना फीच्या 20 टक्के दंड आणि एक डिमेरिट गुण दिला. पण आयसीसीच्या या कारवाईने ऑस्ट्रेलियन मीडिया नाराज असल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्रांनी विराट कोहलीवर निशाणा साधला.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्राr ऑस्ट्रेलियन मीडियावर चांगलेच भडकलेले दिसले. शास्त्राr म्हणाले, विराटच्या कृतीबद्दल आयसीसीने त्याला शिक्षा दिली आहे. असे असताना ऑस्ट्रेलियन मीडिया विराटला मुद्दाम टार्गेट करत आहे. मालिका सध्या बरोबरीत असल्याने ऑस्ट्रेलियन मीडिया दबाव टाकण्यासाठी मुद्दाम असे करत आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेत आघाडीवर असती तर यापेक्षा वेगळी शीर्षक पाहायला मिळाली असती. आयसीसीकडून जी शिक्षा सुनावली जाते त्याची एक प्रक्रिया असते. विराटवर झालेली कारवाई सर्व प्रक्रियेनंतर रितसर झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List