रामटेक बंगला इतिहासातील या कारणांमुळे चर्चेत, चंद्रशेखर बावनकुळे बंगला बदलणार?

रामटेक बंगला इतिहासातील या कारणांमुळे चर्चेत, चंद्रशेखर बावनकुळे बंगला बदलणार?

Ramtek Bungalow Mumbai: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर बंगल्याचे वाटप झाले आहे. या बंगले वाटपावरुन शिवसेनेतील मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. कारण काही मंत्र्यांना बंगल्याऐवजी फ्लॅट दिले गेले आहे. महायुती सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीनंतर सर्वात ज्येष्ठ ठरलेले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला आहे. परंतु रामटेक बंगल्याचा इतिहास पहिल्यास बावनकुळे बंगला बदलण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रामटेक बंगला ज्या मंत्र्यांना मिळाला, त्यांचे भवितव्य काय झाले? ही चर्चा आता सुरु झाली आहे.

समुद्रकिनारी प्रशस्त बंगला, पण…

मलबार हिल परिसरातील समुद्रकिनारी असणारा रामटेक बंगला मोठा, आरामदायी आणि प्रशस्त आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शासनाने हा बंगला दिला आहे. परंतु रामटेक बंगल्याची बावनकुळेंकडून अदलाबदल करणार असल्याची चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत बावनकुळे बंगल्याची अदलाबदल करण्याचे म्हटले जात आहे.

रामटेक बंगला घेण्याची पंकजा मुंडे यांची तयारी असल्याची सुत्रांनी सांगितले. कारण या बंगल्यात गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना राहिले होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे रामटेक बंगल्याशी भावनिक नातेही आहे.

रामटेक बंगल्याचा असा राहिला इतिहास

छगन भुजबळ : काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात भुजबळांना हा बंगला मिळाला होता. त्यावेळी तेलगी प्रकरण गाजले. स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ यांचे नाव आले. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

एकनाथ खडसे : युती सरकारच्या काळात कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना रामटेक बंगला मिळाला होता. पण त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते.

पुन्हा छगन भुजबळ : २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्या सरकारमध्ये भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय मिळाले. पण भुजबळ मंत्री असलेले मविआ सरकार अडीच वर्षात कोसळले.

दीपक केसरकर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालेले असताना केसरकर यांना मात्र मंत्रिपद गमवावे लागले. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा पत्ता कापण्यात आला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलीस डायरी – पप्पू कलानी, अरुण गवळीनंतर कोण? ‘बीड’ मधील सूत्रधारांचे काय ? पोलीस डायरी – पप्पू कलानी, अरुण गवळीनंतर कोण? ‘बीड’ मधील सूत्रधारांचे काय ?
>> प्रभाकर पवार एकोणीसशे नव्वदच्या दशकात उल्हासनगरातील ‘एका शाळेत एसएससी बोर्डाची परीक्षा सुरू असताना हरेश पटेल या गुंडाने आपल्या चार...
सोन्याप्रमाणे आता चांदीच्या दागिन्यांनाही हॉलमार्क
लक्षवेधक – कोल्ड्रिंक्सवरचा खर्च 24 टक्क्यांनी वाढला
काय सांगता! 6 मुलांची आई भिकाऱ्यासोबत पळाली; नवऱ्याची पोलीस स्टेशनमध्ये धाव
पालची खंडोबा यात्रा अपघाताविना आनंदात पार पाडा! जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन
दहशतीसह विविध गुन्ह्यांत फरारी आरोपीला अटक, मोहोळ पोलिसांची कामगिरी; आरोपी शिंदे गटाचा माजी तालुकाप्रमुख
शेतकऱ्यांच्या ‘पांढऱ्या सोन्या’ ला भाववाढीची प्रतीक्षा