…अन् एकनाथ शिंदे विनोद कांबळीच्या मदतीला धावले, उपचारासाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी आर्थिक मदत

…अन् एकनाथ शिंदे विनोद कांबळीच्या मदतीला धावले, उपचारासाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी आर्थिक मदत

माजी क्रिकेट विनोद कांबळी याची प्रकृती खालावली आहे, त्याला उपचारासाठी भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या विनोद कांबळीकडे बीसीसीआयच्या पेन्शन व्यतिरिक्त उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नाहीये. अशाच उपचारावर होणारा एवढा खर्च कुठून करायचा असा त्याच्यासमोर प्रश्न आहे. मात्र एक दिलासादायक बातमी म्हणजे विनोद कांबळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर येताच त्याच्या उपचारासाठी अनेक जण पुढे येत आहेत. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विनोद कांबळीला मदत केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विनोद कांबळीच्या उपचारसाठी पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी विनोद कांबळी यांची भेट घेऊन, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत ही मदत केली आहे. तसेच कांबळीच्या तब्येतीबाबत डॉक्टरांकडे चौकशी करून, उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही याची काळजी घ्या अशी विनंती देखील चिवटे यांनी केली आहे.

कांबळीने मानले आभार

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विनोद कांबळीच्या उपचारासाठी पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. या मदतीसाठी क्रिकेटपटू विनोद कांबळीने एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत, तसेच त्यांनी एकदा हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी यावं अशी विनंती देखील त्याने केली आहे. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे विनोद कांबळीची भेट देखील घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

विनोद कांबळी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो. नुकताच त्याचा सचिन सोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, या व्हिडीओमुळे तो पुन्हा चर्चेत आला. एका कार्यक्रमासाठी सचिन आणि विनोद कांबळी दोघे देखील आले होते. यावेळी त्याने सचिनची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला खुर्चीवरून उठता देखील आले नाही, तर याच कार्यक्रमात त्याने आपले गुरू रमाकांत आचरेकर सर यांच्या आठवणीत एक गाणं म्हटलं होतं, तेव्हा देखील त्याचे शब्द अडखळत होते. त्यानंतर त्याला मदत करण्यासाठी अनेक जण पुढे आले.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये अक्षराकडे ‘गुड न्यूज’; काय असेल अधिपतीची प्रतिक्रिया? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये अक्षराकडे ‘गुड न्यूज’; काय असेल अधिपतीची प्रतिक्रिया?
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ या मालिकेत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अक्षराच्या आयुष्यात अनपेक्षित वळण येतंय. घर...
“सांताक्लॉजला पत्र लिहून सांगेन की..”; ख्रिसमसनिमित्त लीला, शिवा, पारूने सांगितल्या आपल्या इच्छा
‘फक्त वर्षभर डेटिंग अन् त्यानंतर..’; पत्नी शुरासाठी अरबाज खानची खास पोस्ट
पतीच्या संमतीशिवाय माहेरच्यांना घरात ठेवणे ही ‘क्रूरताच’, कोलकाता हायकोर्टाचा निर्वाळा
Mumbai crime news – पोलिसांनी चार तासांत वाचवले 4.65 कोटी रुपये
पालकमंत्री पदावरून गोगावले-तटकरेंत बॅनरवॉर
शीव कोळीवाड्यातील इमारतींचा पुनर्विकास पुन्हा लांबणीवर; निविदा प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती