बॅलेट पेपरवर मतदान व्हावे, ही लोकांची इच्छा, ईव्हीएमवरून जयंत पाटील यांची महायुतीवर टीका

बॅलेट पेपरवर मतदान व्हावे, ही लोकांची इच्छा, ईव्हीएमवरून जयंत पाटील यांची महायुतीवर टीका

मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त करत बॅलेट पेपरने मतदान घेण्याचं ठरवलं होतं. यातच मॉक पोलचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सरकारने मॉक पोल थांबवत ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल केले तर जाही लोकांना अटक ही केली आहे. याचविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच आज सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावात ईव्हीएम हटाओ, संविधान और देश बचाओ या आंदोलनात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणाले आहेत की, ”सोलापुरातील मारकडवाडी हे गाव देशभरातील ईव्हीएम विरोधाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आज शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीत मारकडवाडीच्या गावकऱ्यांनी केलेल्या निर्धारास बळ दिले. चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मारकडवाडीची माती अर्पण करून हे आंदोलन आमदार उत्तमराव जानकर यांनी सुरू केले आहे. त्यास प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे.”

जयंत पाटील म्हणाले की, ”हे पहिल्यांदा असं घडलं की, मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने तीनदा चारदा आपली आकडेवारी दुरुस्त केली. आणि काही लाख मतं मतदान पेटीत वाढली हे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलं. महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद असल्याचे चित्र होते. मात्र निकाल अनपेक्षित लागले.”

पाटील म्हणाले, ”पोस्टाने आलेली मते साधारण त्या मतदारसंघाचा ट्रेण्ड दाखवते. 2019 साली पोस्टल मतदानात पुढे असलेल्या पक्षांचे अधिक उमेदवार निवडून आले. मात्र 2024 मध्ये पोस्टल मतदानाचा ट्रेण्ड त्यांच्यासाठी चढा ठरला. आपल्या तीन पक्षांसाठी उतरता. हा विरोधाभास आहे. म्हणून लोकांच्या मनात शंका आहे. लाडक्या बहिणींना योजनेतून पैसे मिळाले असतील, पण पैसे मिळाले म्हणून महाराष्ट्र विकला जाणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी मोठे धैर्य दाखवले आहे. त्यांनी एक चळवळ उभी केली आहे. त्यामुळे आता इतरही गावं प्रेरित होऊन हा प्रयोग करू पाहत आहे.”

जयंत पाटील पुढे म्हणाले की, ”माझ्या मतदारसंघातही काही गावे आहेत, जिथे सर्व पक्ष एकत्रितपणे माझ्यासाठी काम करत असताना देखील मते प्रचंड प्रमाणात घटली. महाराष्ट्रात असे अनेक ठिकाणी पहायला मिळाले. “फ्रीडम ऑफ स्पीच” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकांना दिलेला अधिकार आहे. त्याद्वारे या गावात बॅलेट पेपरवर मतदान व्हावे ही इच्छा लोकांनी व्यक्त केली. मात्र त्यास सरकार का घाबरतेय? यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपर वरच व्हाव्यात ही जनतेचे मागणी आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?