मध्यमवर्गीयांची कमाई लुटत आहे केंद्र सरकार, राहुल गांधी यांची टिका; नवीन टॅक्स स्लॅबमध्ये जीएसटी वाढवणार?
केंद्र सरकारच्या कर धोरणाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना त्यांनी आरोप केला आहे की, मोदी सरकार सामान्य जनतेवर कराचा बोजा वाढवत आहे, तर मोठ्या उद्योगपतींना करात सवलत दिली जात आहे. कॉर्पोरेट टॅक्स आणि आयकर यांच्यातील वाढत्या तफावतीची दखल घेत राहुल गांधी यांनी हा घोर अन्याय असल्याचे म्हटले आणि सरकार ‘गब्बर सिंग टॅक्स’च्या नावाखाली गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाला लक्ष्य करत असल्याचं ते म्हणाले.
जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) संकलन वाढवण्यासाठी सरकार नवीन टॅक्स स्लॅब लागू करण्याच्या तयारीत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे. सर्वसामान्यांना लागणाऱ्या वस्तूंवर जीएसटी दर वाढवण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: 1500 रूपयांपेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवरील जीएसटी 12 टक्यांवरून वरून 18 टक्यांपर्यंत वाढवण्याच्या बातम्यांवरून त्यांनी सरकारवर टीका केली.
याला ‘गब्बर सिंग टॅक्स’चे उदाहरण म्हणत राहुल गांधी म्हणाले की, सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाला लक्ष्य करत आहे. दुसरीकडे, अब्जाधीशांना करात सवलत दिली जात आहे. त्यांची मोठी कर्जे माफ केली जात आहेत. हा जनतेवरील घोर अन्याय असल्याचे सांगत काँग्रेस पक्ष या अन्यायाविरोधात जोरदार आवाज उठवेल, असं ते म्हणाले.
पूंजीपतियों को छूट और आम लोगों से लूट का एक और उदाहरण देखिए।
एक तरफ़ कॉरपोरेट टैक्स के मुक़ाबले इनकम टैक्स लगातार बढ़ रहा है। दूसरी तरफ़ मोदी सरकार गब्बर सिंह टैक्स से और ज़्यादा वसूली की तैयारी कर रही है।
सुनने में आ रहा है कि GST से लगातार बढ़ती वसूली के बीच सरकार एक नया… pic.twitter.com/Zyu21tG8ag
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 7, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List