गीताबोध – क्षत्रियाचा धर्म

गीताबोध – क्षत्रियाचा धर्म

>> गुरुनाथ तेंडुलकर

मागच्या लेखात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘नश्वर देह’ आणि त्या देहातील ‘ईश्वर आत्मा’ यातील भेद समजावून सांगितला. युद्धात मरेल ते केवळ शरीरच. आत्मा तर अविनाशीच आहे. म्हणून तू शोक करू नकोस, असं सांगितलं. तरीही अर्जुनाचं समाधान होऊन तो तत्काळ युद्धाला तयार झाला नाही. म्हणून भगवंतांना अजून एक पायरीने अर्जुनाला वरच्या पातळीवर न्यावा लागला.

भगवान अर्जुनाला उद्देशून म्हणतात…

स्वधर्मम् अपि च अवेक्ष न विकम्पितुम् अर्हसि

धर्म्यात् हि युद्धात् श्रेय अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते ।।31।।

भावार्थ ः हे अर्जुना, तू क्षत्रिय आहेस. त्यामुळे स्वतच्या क्षात्रधर्माच्या दृष्टीनेही युद्धाला घाबरून युद्ध टाळणे तुला शोभत नाही. वेगवेगळी कारणं सांगून तू युद्ध टाळायला बघतो आहेस, पण तुझं हे वागणं योग्य नाही. ते धर्मसंमत नाही. कारण क्षत्रियांना युद्धाहून अधिक श्रेयस्कर असं जगात दुसरं काहीच नसतं. युद्ध हाच क्षत्रियांचा खरा धर्म आहे.

क्षत्रिय आणि त्यांचा क्षात्रधर्म याबद्दल बोलण्याआधी आपण ‘क्षत्रिय’ या शब्दाचा नेमका अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सनातन वैदिक धर्मानुसार चार प्रमुख वर्ण सांगितले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे चारही वर्ण समाजाचे व्यवहार सुरळीत चालावेत आणि समाजाची गतिशीलता उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावी यासाठी केवळ आवश्यकच नव्हेत, तर अपरिहार्यच आहेत.

ब्राह्मण म्हणजे बुद्धिजीवी वर्ग. विद्यार्जन आणि विद्यादान करणं ही ब्राह्मणांची प्रमुख कर्तव्ये, त्या व्यतिरिक्त आपल्या बुद्धीचा यथायोग्य उपयोग करून समाजाच्या समृद्धीसाठी सतत कार्यरत राहाणे हा ब्राम्हणाचा धर्म. ब्राह्मण या वर्णात शिक्षक, लेखक, कवी, समाजसुधारक, विद्वान बुद्धिजीवी, समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे अभियंते, समाजाच्या निरामय आणि स्वास्थ्याविषयी जागरुकपणे कार्य करणारे डॉक्टर-वैद्य तसंच निरनिराळ्या विषयांवर संशोधन करून समाजाला पुढे पुढे नेणारे शास्त्रज्ञ यासारख्या अनेक घटकांचा समावेश होतो.

अलीकडे मात्र ‘ब्राह्मण’ हा शब्द केवळ एक जातीवाचक शब्द म्हणून वापरला जातो. समाजातील सर्वसामान्य आणि भोळ्याभाबडय़ा जनतेच्या मनात विद्वेशाची आग भडकावून त्या आगीवर आपली राजकीय पोळी भाजणारे काही स्वार्थी राजकारणी ब्राह्मणांबद्दल सतत उपाहासात्मक आणि अश्लाघ्य बोलतात. ‘ब्राह्मण म्हणजे केवळ दोन टक्क्यांचा वर्ग.’ अशा शब्दात ब्राह्मणांची अवहेलना करतात. वास्तविक जगातील कोणत्याही घटकांत ‘दोन टक्के’ फार महत्त्वाचे असतात. शंभर लिटर दुधात दोन किलो साखर घातली की त्या शंभर लिटर दुधाची गोडी वाढते. पातेलंभर बासुंदीत चार-सहा केशर कांडय़ा मिसळल्या की बासुंदीचा रंग आणि लज्जत वाढते. मिठाईवर पातळसा चांदीचा वर्ख त्या मिठाईची किंमत वाढवतो… दोन टक्के म्हणजे काहीच नाही असं समजणाऱयांसाठी सांगतोय. कोणत्याही फुलझाडाच्या एकूण वजनाच्या केवळ दोन टक्केच वजनाएवढी फुलं त्या झाडावर असतात. त्या दोन टक्के फुलांमुळेच त्या झाडाची शोभा वाढते. असो…

गलिच्छ राजकारण करून समाजात तेढ पसवणाऱया स्वार्थी नेत्यांच्या नादी न लागता भारतीय परंपरेतील हे चार वर्ण आणि त्यातून सांगितलेला सनातन धर्म नीट समजून घ्यायला हवा.

दुसरा वर्ण आहे क्षत्रिय. ह्या वर्णाचं प्रमुख कर्तव्य म्हणजे समाजातील सगळ्या घटकांचं यथायोग्य रक्षण करणं. पूर्वीच्या काळात गावांच्या, नगरांच्या आजूबाजूला घनदाट जंगलं होती. त्यात अनेक हिंस्त्र श्वापदं होती. त्या हिंस्त्र श्वापदांपासून नगरजनांचं आणि गुराढोरांचं संरक्षण करणं हे त्या काळातील क्षत्रियांचं प्रमुख कर्तव्य होतं. तसंच शेतीचा नाश करणाऱया जनावरांच्या कळपापासून शेतीचं रक्षणदेखील करणं आवश्यक होतं. म्हणूनच त्या काळात राजाला आणि राजघराण्याशी संबंधित काही व्यक्तींना मृगयेची म्हणजेच शिकारीची अनुमती दिली होती. समाजाच्या संरक्षणासाठी कार्यरत असण्यासाठी या वर्गातील लोकांमधे विशिष्ट प्रकारची शारीरिक क्षमता आणि काही विशेष गुण अंगी असावे लागत. जिगरबाज वृत्ती, निर्भयता, योग्य उंची-वजन, चपळपणा, गतिशील धावणं, नेमबाजी इत्यादी. पुढे हेच क्षत्रिय केवळ हिंस्त्र श्वापदांपासूनच नव्हे तर शेजारच्या राज्यांतून होणाऱया परकीय आक्रमणापासूनदेखील नगरवासीयांचं रक्षण करू लागले. पुढे पुढे क्षत्रियांच्या कर्तव्याची कक्षा विस्तारत गेली. परकीय आक्रमकांच्या जोडीने आपल्याच नगरातील समाजकंटकांचा योग्य तो बंदोबस्त करून समाजातील सज्जनांचं संरक्षण करणं हाही क्षत्रियांचा धर्म झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील विविध वर्गातील योग्य माणसं निवडून त्यांना युद्धकलेचं शिक्षण देऊन त्यांची संघटना बांधली आणि त्यांना नाव दिलं ‘मावळा.’ शिवकालीन मावळा हा ‘क्षत्रिय’ या वर्णात मोडतो. सध्या काही राजकारणी जातीजातीत आणि धर्माधर्मांत तेढ पसरवून सत्तेसाठी द्वेषाची आग भडकवताना दिसताहेत. काही आचरट-अर्धवट पुढाऱयांना हाताशी धरून समाजाला वेठीला धरताहेत. असो. तर क्षत्रिय म्हणजे समाजाचा रक्षणकर्ता. क्षत्रिय या शब्दाच्या कक्षेत देशाचं बाह्य शत्रूंपासून रक्षण करणाऱया सैन्यदलातील सैनिक, तसंच अंतर्गत सुरक्षा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी कार्यरत पोलीस दल यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे स्वतचा जीव धोक्यात घालून आगीपासून नागरी मालमत्तेचं संरक्षण करणारे अग्निशामक दलातील जवान आणि समुद्रतटावरील तटरक्षक दलातील जवान यांनादेखील क्षत्रियच म्हणायला हवं.

तिसरा वर्ण आहे वैश्य. व्यापार-उदीम करणारे, शेती करून त्या शेतमालाची विक्री करणारे शेतकरी, कृषीकर्मी, तसंच वित्तसंबंधी समाजाला सेवा देणाऱया वर्गाचा समावेश होतो. अलीकडच्या काळातील बँकिंग, इन्शुरन्स आणि शेअर बाजारात काम करणारे दलाल तसंच वित्तीय सल्लागार हे सर्वजण या वर्गातील आहेत.

चौथा वर्ग आहे शुद्र… हा वर्ग सेवेकरी म्हणून ओळखला जातो. काही विशिष्ट कारागीर आणि मजूर वर्ग यात समाविष्ट होतात. समाजाच्या गतिशील संवर्धनासाठी या चारही वर्गात समन्वय असणं आवश्यक आहे. त्यात कोणीही उच्च नाही की कोणीही नीच नाही. प्राचीन भारतीय व्यवस्थेतील वर्णाश्रम पद्धती आणि त्यांतून पुढे उदयाला आलेली जातीव्यवस्था याबद्दल पुढे सविस्तर चर्चा होईलच. आज इथे या लेखाचा समारोप करताना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ‘तू क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणं हा तुझा धर्म आहे.’ असं सांगितलं. या श्लोकावर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात.

म्हणोनि तू पाही। तुम्हा क्षत्रियां आणीक काही।।

संग्रामावाचुनि नाही। उचित जाणे।।

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?