जे.जे. रुग्णालयावर वाढतोय रुग्णसंख्येचा ताण, नवीन एमआरआय मशीन बसवा; मनोज जामसुतकर यांची मागणी
शासनाने राज्यातील जनतेला विविध कार्यक्रमाअंतर्गत सर्व शासकीय रुग्णालयात व आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपचार पुरवले आहेत. पण भायखळा विधानसभेतील जे. जे. रुग्णालयात आंतर व बाह्यरुग्णांना तपासणीसाठी बाहेर जावे लागते. तसेच औषधे उपलब्ध नसल्याने बाहेरील औषधाच्या दुकानातून औषधे विकत घ्यावी लागतात. एमआरआय, सिटीस्कॅन मशिन्स जुन्या असल्याने सतत नादुरुस्त असतात. संपूर्ण राज्यातील रुग्ण या हॉस्पिटलमध्ये येत असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी तातडीने नवीन मशिन्स घ्यावी तसेच व्हेटिलेटर बेडची संख्या वाढवणे आवश्यक आहे. अशी मागणी शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी आज विधानसभेत केली
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना मनोज जामसुतकर म्हणाले की, महाराष्ट्रात 2023-24 च्या तुलनेत 2024-25च्या पहिल्या तिमाहीमध्ये थेट परकीय गुंतवणूक वाढल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वीही थेट परकीय गुंतवणूकीचे प्रस्ताव आले परंतु यातील किती टक्के गुंतवणूक राज्यात स्थिर राहिली व किती राज्याबाहेर गेली याचे अवलोकन होणे गरजेचे आहे, असे जामसुतकर म्हणाले. महाराष्ट्र राज्याचा देशाच्या एकूण उत्पन्नात चौदा टक्के वाटा आहे.
वैद्यकीय व्यवस्थेत एआय तंत्रज्ञानाचा वापर करा
माँस्को सरकार आपल्या राज्याशी टेक्नालॉजी ट्रान्सफर व गुंतवणूक या दृष्टीने आपल्याशी करार करण्याचा प्रयत्न करीत आहे. व आपल्या शासनाला सामंजस्य करार करायला विलंब हात आहे. या सामंजस्य कराराला लवकरात लवकर कार्यवाही करावी. राज्यात आधुनिक वैद्यकीय व्यवस्था पुरवता आधुनिक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटन विकसित केल्यास परदेश चलन वाढू शकते असे ते म्हणाले.
– मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील माझगाव ताडवाडीतील पालिकेचा पुनर्विकास प्रकल्प गेल्या अनेक वर्षे प्रलंबित आहे. बीआयटी चाळ चौदा पंधरा व सोळा या इमारतींमधील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून माहुलसारख्या प्रदूषित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. त्याचे माझगावमध्ये पुनर्वसन होण गरजेचे आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्याकडे संयुक्त बैठक बोलवण्याची मागणी मनोज जामसुतकर यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List