भाजप नेत्यांनी जय भीम म्हणून दाखवावं, प्रियंका गांधी यांचे आव्हान
भाजपच्या नेत्यांनी गुंडगिरी करून धक्काबुक्की केली असा आरोप काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला. तसेच भाजप नेत्यांनी जय भीम म्हणून दाखवावं, असे आव्हानही गांधी यांनी दिले.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन जय भीमच्या घोषणा देत होते. या घोषणा देत राहुल गांधी संसदेत जात होते. संसदेत जात असताना राहुल गांधींना कोणी रोखलं? आम्ही एवढे दिवस आंदोलन करत होतो तेव्हा सर्व लोक या मार्गाने संसदेत जात होते. आज भाजपच्या नेत्यांनी पहिल्यांदा आंदोलन केले आणि सगळ्यांना धक्काबुक्की केली. भाजपच्या नेत्यांनी गुंडगिरी केली. आता अमित शाह यांना वाचवण्यासाठी यांनी कट रचला की राहुल गांधींनी धक्का मारला. मल्लिकार्जून खरगे यांना माझ्या डोळ्यांसमोर धक्का मारला, खरगे खाली पडले. त्यानंतर माकपच्या एका खासदाराला धक्का मारला आणि ते खरगेंच्या अंगावर पडले. तसेच आम्ही भाजप नेत्यांना आव्हान दिलं की डॉ. आंबेडकरांबद्दल प्रेम असेल तर जय भीमचा नारा देऊन दाखवा असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List