सिनेमा – नवी दृष्टी देणारा दिग्दर्शक
>> प्रा. अनिल कवठेकर
पटकथेला अत्यंत डिटेलमध्ये मांडण्याचं स्वतचं कौशल्य असलेला हिंदुस्थानी सिनेमातील एक दिग्दर्शक. समांतर सिनेमा म्हणजे सामाजिक बदल घडवून आणणारी चळवळ! मग व्यवसाय कोणताही असो. आपलं समाजाला देणं असतं ही भावना ज्यांच्यामध्ये निर्माण होते ते आपल्या व्यवसायातून समाजातील समस्या, अडचणी मांडण्याचा, त्यावर उपाय सांगण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करतात. या प्रयत्नांमध्ये जे काही मोजके दिग्दर्शक आहेत त्यामध्ये श्याम बेनेगल यांचं नाव प्रामुख्याने घेता येईल. श्याम बेनेगल यांच्या काही चित्रपटांतून त्यांच्या दिग्दर्शन शैलीचा शोध घेत या महान दिग्दर्शकाला अर्पण केलेली ही आदरांजली!
‘अंकुर’ या चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा लाँग शॉटमध्ये दृश्य दिसतात. टेकडीवर पसरलेल्या मोठमोठय़ा शिळा, मंदिराकडे जाणारी वाट, वाद्यांच्या गजरात मंदिराकडे डोक्यावर घागरी घेऊन निघालेल्या महिला… हा त्या गावाचा एक पारंपरिक सण आहे. नायिका लक्ष्मी देवाला आपल्याला मूल होण्याचा आशीर्वाद मागते. तिचा नवरा नारळ फोडतो. देवळाच्या गाभाऱयात अंधार आहे. देव दिसत नाही. दुसरा सीन छोटे ठाकूर खिडकीत उभे आहेत. फाटक उघडते, ट्रेनच्या शिट्टीचा आवाज, लक्ष्मीचा नवरा मुका आणि बहिरा आहे. बैलगाडी चालवताना तो झोपलेला आहे. जातिव्यवस्था व लक्ष्मीचं बैलगाडीच्या पुनिघून जाणं. लक्ष्मी छोटे ठाकूरच्या घरात सारखी काही ना काही काम करताना दिसते आणि छोटे ठाकूर तिच्याकडे पाहत असतात. मालकाच्या झाडाची शिंदी न सांगता प्याला म्हणून त्याला टक्कल करून गाउलटे बसवून त्याची धिंड कायात येते. चित्रपटातील ही सगळी दृश्ये आपल्याला काही सुचवत नाहीत. पण तो श्याम बेनेगल यांचा चित्रपट असल्याने यातील प्रत्येक फ्रेम आपल्याशी बोलू लागते. त्या प्रत्येक फ्रेमची एक कविता होते.
भावगीत, लोकगीत ही सगळ्यांना समजतात. पण शास्त्राrय संगीत समजत नाही. श्याम बेनेगल, सत्यजित रे यांसारख्या दिग्दर्शकांबाबत हेच म्हणावं लागेल. त्यांचे चित्रपट म्हणजे एक प्रकारचं शास्त्राrय संगीतच आहे. ते समजण्यासाठी विचारांची बैठक आधी तयार व्हायला हवी. तर यातल्या दृश्यांमागचा आशय काय आहे? विषय गावातल्या अंधश्रद्धेचा आहे. ज्या रस्त्यावरून चाललेत तिथे उंच मोठय़ा शिळा आहेत. मंदिरात अंधार असल्याने देव दिसत नाही. मुळात देव हा निराकार आहे. म्हणून हा अंधार अज्ञानाचा आहे. छोटे ठाकूर नव्या पिचा आहे जातीव्यवस्था न मानणारा आहे. मात्र ठाकूर असण्याचा त्याला अहंकार आहे. जेव्हा तो खिडकीत उभा दिसतो तेव्हा खिडकींच्या गजांमधून तो जुन्या विचारांच्या तुरुंगात असल्याचं दिसतं. ट्रेनची शिट्टी त्याच्या आतला आवाज आहे. रेल्वेचं फाटक उघडतं ते त्याला तिथून बाहेर पडायला सांगणारा विचार आहे.
गावातल्या रस्त्यावरच्या खड्डय़ात छोटे ठाकूरच्या गाडीचं चाक अडकतं. तेव्हा गावातील पोलीस पाटील तिथे येतो आणि आपली ओळख सांगून गाडी खड्डय़ातून स्थानिकांच्या मदतीने बाहेर कास्वत गाडीला धक्का मारत नाही. गोष्ट साधी आहे. पण त्यातून गावातील प्रत्येक व्यक्तीची मानसिकता दिसते. गावातला निवांतपणा, आरामात दुकानात, घराच्या ओटय़ावर बसलेल्या व्यक्ती… त्यांनी त्या परिस्थितीशी समझोता करून स्वतला त्यात बांधून घेतलेलं आहे. छोटे ठाकूरकडे गावातल्या येणाऱया लोकांचा क्रम पाहिला तर बेनेगलांचं दिग्दर्शन किती अप्रतिम असल्याचं लक्षात येतं. लक्ष्मीचा मुका-बहिरा नवरा गावातील मुक्या-बहिऱया समाजाचं प्रतिनिधित्व करतो. आपल्याला मूल होत नाही या एका वेदनेजवळ त्यांचं आयुष्य जणू थांबलेलं आहे. या चित्रपटाच्या शेवटी एक लहान मुलगा ठाकूरच्या खिडकीची काच दगड मारून फोडतो म्हणजे तो मुलगा या व्यवस्थेला नाकारतो. त्याचं स्वत्व जागं होतं.
नंतर त्यांचा ‘निशांत!’ निशा म्हणजे रात्र. रात्रीचा अंत म्हणजे दिवस उगवणं. ही एका अशा गावाची कहाणी आहे जिथे अंधार आहे. प्रत्येक गावकरी गुलाम आहे. जमीनदार राजा आहे. आज तुझ्या बायकोला वाडय़ावर पाठव असं सांगणाऱयाला आणि पाठवणाऱयाला लाज वाटत नाही. या गावात पहाट होण्यासाठी एक शिक्षक पुजाऱयाचे डोळे उघडतो अशी एका ओळीत सांगता येईल अशी कथा. त्यांचं दिग्दर्शनाची वैशिष्टय़ म्हणजे एखादी गोष्ट ते पूर्ण दाखवतात. ‘निशांत’मध्ये अंघोळ करून जाणारा पुजारी 18-19 पायऱया चर्यंत कॅमेरा एकाच जागी असतो. अंघोळ करून येणारा पुजाऱयाच्या हातात पेटता कंदील पुजारी पहाटेच्या अंधारात आंघोळीला गेल्याचं दर्शवतं. देवळात चोरी झालेली आहे. गर्दी आहे पण माणसं दिसत नाहीत. दिसतात फक्त सावल्या. पोलीस पाटील येईपर्यंत बराच वेळ झाल्याचं कंदिलाची पूर्णपणे काळी पडलेल्या काचेवरून कळतं. पुजाऱयाला कंदिलाची वात विझवण्याचं भान राहिलेलं नाही. कारण चोर कोण आहे हे त्याला माहित आहे पण तो हतबल आहे. त्या गावात बडा शेठची दहशत असल्याने त्याच्याविरुद्ध कोणी बोलायला तयार नाही. इथे दृश्यात कुणी काही बोलत नाही तरी दृश्याची परिणामकारकता आपल्या हृदयामध्ये वेदना जागी करते.
टेकडीवरील मोठमोठय़ा शिळांच्या मधून वाट कायेणारा शिक्षक दिसतो. त्याच्या मार्गातील समस्या म्हणजे शिळा आहेत. निसर्गाला विविध रूपात दाखवण्यात बेनेगलांची शैली वेगळी होती. चित्रभाषा हे श्याम बेनेगलांचे सूत्र होतं. त्यामुळे त्यांच्या चित्रपटातलं दृश्य जे सांगायला हवं ते संवाद नसून चपखलपणे सांगतं. त्यामुळे हवा तो परिणाम साधत कथा पुसरकते. अनेकदा केवळ हसण्यामधून काय सांगायच आहे ते कलाकारांकडून काघेत. जसं ‘निशांत’मध्ये शेठची दोन्ही मुलं वाया गेलेली असतात. त्या दोघांना फारसे संवाद नाहीत. ते दोघे फक्त हसतात आणि एकेक शब्द उच्चारतात. त्यांचा वाह्यातपणा त्या दृश्यातून स्पष्टपणे व्यक्त होतो.
तिसरा चित्रपट ‘त्रिकाल!’ अर्थात भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. चित्रपट सुरू होतो पडद्यावरती हिरवगार शेत दिसतं शेतातून जाणाऱया पायवाटेवरून चिखल तुडवत एक माणूस जाताना दिसतो. त्याच्या डोक्यावरच्या काफिन आहे. जे त्याला एका ठिकाणापर्यंत पोहोचवायचं आहे. कोणाच्यातरी मरणावर एका गरीबाचा रोजगार चालू आहे. त्याचा काफिन घेऊन प्रवास चाललेला आहे. तो गोव्यातला आदिवासी आहे. चर्चच्या आवारात काफिन पुरण्यासाठी खड्डा केला जात आहे. दोन आदिवासी डुक्कर पकडून निघालेले आहेत. रोइझ परेरा आपल्या जीवनाची कथा सांगतोय. तो त्या हवेली जवळ पोहोचतो. तेव्हाच काफिन घेऊन जाणारा माणूस त्याच्या मागून हवेली जवळ पोहोचतो.
पहिल्या सात मिनिटातच नसरुद्दीनच्या संवादातून आणि पडद्यावर दिसणाऱया चित्रातून चित्रपटाच्या कथेत गुंतणं सुरू होतं. जवळजवळ 13 मिनिटापर्यंत नसरुद्दीन कथा सांगतो. जेव्हा चित्रपटातील पात्रं पोर्तुगीज भाषेत बोलू लागतात तेव्हा तो त्याचा अनुवाद करून सांगतो. नंतर म्हणतो की हा अनुवाद मी किती वेळ करणार त्यापेक्षा त्यांना आपल्याला कळणाऱया भाषेत (हिंदीत) बोलू दे. हे शाम बेनेगलांच्या दिग्दर्शनाचं वेगळेपण होय.
‘पीके’ चित्रपटातून हिंदू देवदेवतांची बदनामी केली असल्याचे आणि हिंदू धर्मातील अंधश्रद्धा दाखवली जात असल्याचे बोलले गेले. या बाबतीत श्याम बेनेगल खूप पुहोते. ‘त्रिकाल’मध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धेवर बोट ठेवले आहे. डोना मरियाचा नवरा मेलेला आहे आणि ते ती मान्य करायला तयार नाही. ती संगीत ऐकत आहे.
‘जब सुख देखा ही नही तो दुख किस बात का?’
‘वो यादे हमे क्यू सताती है जिनके बारे मे हमे कुछ मालूम नही है!’
या दोन संवादातून चित्रपटाचा आशय स्पष्ट होतो. ज्या दिवशी दुपारी तिच्या नवऱयाचं दफन करण्यात येतं त्याच रात्री मारिया त्याच्या आत्म्याला बोलावते. त्यासाठी माध्यम म्हणून एका कुमारिकेची आवश्यकता असते. त्यांच्या घरात एकमेव कुमारिका म्हणजे मिलग्रेनिया… तिच्या नवऱयाची अनौरस संतान! तिच्या माध्यमातून नवऱयाच्या आत्म्याला बोलावताना तिथे प्रत्यक्षात विजयसिंग राणेचं भूत येतं. विजयसिंह राणे याला दगा फटका करून पकडण्यात आलेलं असतं आणि मारलेलं असतं. ते भूत कर्कश्यपणे ओरडून बोलतं. पण मारिया काही घाबरत नाही. ती त्याला जायला सांगते.
संपूर्ण चित्रपट मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात चित्रित केलेला आहे. फक्त नसिरुद्दीन शहा कारमध्ये बसतो तेव्हा वर्तमान काळात येतो. इथे पूर्ण प्रकाशाचा उपयोग केलेला आहे. भूतकाळातली दृश्ये मंद प्रकाशातली आहेत. कथेला ऐतिहासिक संदर्भ आहे. पोर्तुगीज देशाचे नागरिक असणारे ख्रिश्चन गोव्यात राहिले. पोर्तुगीज लोकांची मानसिकता, स्थानिक लोकांची मानसिकता, विवाहाची बोलणी, आत्म्याला बोलावणं, मृत नवऱयाला विचारून निर्णय घेण्याची मानसिकता, अंधश्रद्धा, कवळी घातलेला जावई, लिऑन आणि अॅनाची प्रेम कहाणी, क्रांतीकारक राणेची हत्या… अशा अनेक छोटछोटे प्रसंग इतक्या सहजतेने कथेमध्ये गुंफले गेले आहेत. त्या पटकथेतून वेगळ्या कायेत नाहीत. श्याम बेनेगल यांना या चित्रपटासाठी दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांचे सगळे चित्रपट प्रत्येक वेळी पाहताना नवीन दृष्टी देणारे आहेत.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List