धक्काबुकी, घोषणाबाजी आणि राडा; संसदेत नेमकं काय घडलं? मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितली संपूर्ण घटना

धक्काबुकी, घोषणाबाजी आणि राडा; संसदेत नेमकं काय घडलं? मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितली संपूर्ण घटना

आज संसदेचे कामकाज सुरू होण्याआधी संसदेच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. भाजप खासदारांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धक्काबुकी करत संसदेत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. याच धक्काबुकीत भाजपचे दोन खासदारही जखमी झाले आहेत. नेमकी ही घटना कशी घडली, नेमकं काय झालं होतं? याचबद्दल आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेत खरेग यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही उपस्थित होते.

संसदेत नेमकं काय घडलं?

पत्रकार परिषदेत या घटनेबाबत माहिती देताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ”आज आमचं निषेध आंदोलन होतं. आम्ही संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आहे, तिथून निघालो. आम्ही शांततापूर्ण पद्धतीने एका लाईनीत येत होतो, त्याचवेळी त्यांना काय सुचलं मला माहित नाही. आम्ही चालत येत असताना त्याचवेळी मकरद्वारावर आम्हाला थांबवण्यासाठी ते (भाजप खासदार) तिथे बसले. आम्हाला संसदेत जायचं होतं. मात्र त्यांनी आम्हाला दरवाज्यावर अडवलं. आम्हाला थांबण्यासाठी भाजपचे अनेक पुरुष खासदार तिथे उभे होते. ते आम्हाला रोखण्यासाठी बाहुबळाचा वापर करत होते.”

खरगे म्हणाले, ”आमच्यासोबत आमच्या महिला खासदार होत्या, त्या शांत पद्धतीने येत होत्या. मात्र त्यांनाही ते थांबवत होते. त्यांनी जोरजबरदस्ती करत आमच्यावर हल्ला केला. मी आधीच कोणाला धक्का देण्याच्या स्थितीत नाही, मात्र त्यांनी मला धक्का दिला. त्यांनी मला धक्का दिल्यानंतर माझा तोल गेला आणि मी खाली बसलो. स्वतः धक्काबुकी करून आता ते आमच्यावर उलट आरोप करत आहेत की, आम्ही धक्का दिला आणि त्यांना पाडलं.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List