‘डाबर’मधील मराठीद्वेष्ट्या बिहारी अधिकाऱ्याला शिवसेनेचा दणका

‘डाबर’मधील मराठीद्वेष्ट्या बिहारी अधिकाऱ्याला शिवसेनेचा दणका

महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यापासून परप्रांतीयांची मुजोरी वाढली आहे. गिरगाव, कल्याणची घटना ताजी असताना फोर्टमध्ये ‘डाबर’ कंपनीतील बिहारी अधिकाऱ्याच्या मराठी द्वेषाचा संतापजनक प्रकार शुक्रवारी समोर आला. ‘एक बिहारी सब पे भारी’ असे नेहमी ऐकवत बिहारी अधिकाऱ्याने मराठी कर्मचाऱ्याला नाहक मनस्ताप देणे सुरू ठेवले होते. या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने कंपनी गाठली आणि बिहारी अधिकाऱ्याला ‘शिवसेना स्टाईल’ दणका दिला. त्यानंतर शरण येत या मुजोर अधिकाऱ्याने माफी मागितली.

दक्षिण मुंबईत फोर्ट परिसरात ‘डाबर’ कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीत महेश पवार हे 19 वर्षांपासून काम करीत आहेत. कंपनीतील ‘सीनिअर लॉजिस्टिक मॅनेजर’ या वरिष्ठ पदावर नितीश कुमार हा बिहारी अधिकारी कार्यरत आहे. महेश पवार हे मराठी असल्याने नितीश कुमार पवार यांना सहा महिन्यांपासून मानसिक त्रास देत होता. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यापासून नितीश कुमारची मग्रुरी वाढली आणि त्याने ‘एक बिहारी सब पे भारी’ असे पवार यांना नेहमी ऐकवण्यास सुरुवात केली. वारंवारच्या मनस्तापामुळे पवार यांची तब्येतदेखील खालावली. बिहारी अधिकाऱ्याच्या मराठी द्वेषाला त्रस्त झालेल्या महेश पवार यांनी शिवसेना दक्षिण मुंबई कार्यालयात संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तातडीने ’डाबर’ कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली आणि मराठीद्वेष्ट्या नितीश कुमारची कडक शब्दांत कानउघाडणी दिली.

मराठी माणसांची गळचेपी कदापि सहन करणार नाही!

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ‘डाबर’ कंपनीच्या व्यवस्थापनाला लेखी निवेदनही दिले. महाराष्ट्रात मराठी माणसांना अशा प्रकारे त्रास देऊन त्यांची गळचेपी केली जात असेल तर कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्रातील मराठी माणूस शांत बसणार नाही. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्ष सदैव लढत राहील, असा इशारा शिवसेना विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला.

शिवसेनेने दणका देताच मागितली माफी

मराठी कर्मचाऱ्याला दिलेल्या त्रासाची माहिती मिळताच शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्वरित कार्यालयाला भेट दिली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाला तंबी देतानाच मराठीद्वेष्ट्या बिहारी अधिकाऱ्याला मराठी माणसांची माफी मागण्यास भाग पाडले. शिवसेनेने दणका देताच मस्तवाल अधिकाऱ्याचा ‘एक बिहारी, सब पे भारी’चा माज काही क्षणांत उतरला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“21 लाखांचं बक्षीस देईन जर मुलीच्या बॉयफ्रेंडला..”; बिग बॉसच्या निर्मात्यांना चाहत पांडेच्या आईचं खुलं आव्हान “21 लाखांचं बक्षीस देईन जर मुलीच्या बॉयफ्रेंडला..”; बिग बॉसच्या निर्मात्यांना चाहत पांडेच्या आईचं खुलं आव्हान
‘बिग बॉस’चा अठरावा सिझन चांगला चांगलाच गाजतोय. सूत्रसंचालक सलमान खानचा हा सर्वांत वादग्रस्त रिअॅलिटी शो त्यातील हाय-व्होल्टेज ड्रामासाठी सतत चर्चेत...
अभिनेत्रीने लेकींसाठी सोडली मायानगरी; मुंबईपासून दूर ‘या’ ठिकाणी करतेय संगोपन, सांगितलं खास कारण
सतत रडत बसायची गरज काय? ‘बिग बॉस 18’मधील शिल्पा शिरोडकरबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?
श्वास कोंडतो, बर्ड फ्ल्यू सारखी लक्षणं… चीनमधील HMPV डेंजर व्हायरसची लक्षणे काय?; जाणून घ्या, सतर्क व्हा
बंगळुरूत HMPV चा पहिला रुग्ण, आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
सावधान… लहान मुलं आणि ज्येष्ठांनाच या व्हायरसची लागण, चीनच्या खरतनाक HMPV भारतात एन्ट्री, पहिला रुग्ण सापडला
अनियंत्रित बस दरीत कोसळली, चार प्रवाशांचा मृत्यू; अनेक जण जखमी