7 वर्ष रिलेशनशिप, ब्रेकअपनंतर करोडपती बिझनेसमनसोबत लग्न, वडापाव खाऊन दिवस काढले; 5,000 कमावणारी मराठमोळी अभिनेत्री आता 30 कोटींची मालकीण

7 वर्ष रिलेशनशिप, ब्रेकअपनंतर करोडपती बिझनेसमनसोबत लग्न, वडापाव खाऊन दिवस काढले; 5,000 कमावणारी मराठमोळी अभिनेत्री आता 30 कोटींची मालकीण

बॉलिवूडप्रमाणेच टेलिव्हीजन इंडस्ट्रीदेखील तेवढीच प्रसिद्ध आहे. कारण या इंडस्ट्रीमधून अनेक चांगले कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले, यातील काहींना तर थेट बॉलिवूडमध्येही खास ओळख मिळाली. आणि त्यानंतर त्यांचं आयुष्यचं पालटलं.

टेलिव्हीजन इंडस्ट्रीमधील अशीच एक अभिनेत्री जिने तिच्या सौंदर्यांने अन् अभिनयाने टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये अगदी कमी वेळात आपली ओळख निर्माण केली. आणि मालिका गाजवली एवढच नाही तर या अभिनेत्रीने टीव्हीसोबतच आता बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे.

अभिनेत्री करोडो रुपयांची मालकीण बनली

या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अभिनयाची जेवढी चर्चा झाली नाही तेवढ तिच्या वैयक्तिक आयुष्याची झाली. एका मालिकेनंतर आणि एका ब्रेकअपमुळे तिच्या आयुष्यात 360 डिगरी बदल झाला. आज तिच्या मेहनतीमुळे ही अभिनेत्री करोडो रुपयांची मालकीण बनली.

ही अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. जिच्या अभिनयामुळे ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली होती. अंकिता लोखंडेचा जन्म 19 डिसेंबर 1984 रोजी इंदूरमध्ये झाला आणि तिने लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिले होते. हा छंद पूर्ण करण्यासाठी ती शिक्षण पूर्ण करून मुंबईत आली.

अंकिताला 75-100 रुपये मानधन मिळायचं

अंकिताचे खरं नाव तनुजा लोखंडे आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. 2005 मध्ये अभिनेत्री मुंबईत आली होती. जिथे त्याने प्रसिद्धी मिळवण्याआधी दीर्घ संघर्ष पाहिला. अंकिताने अनेकवेळा मुलाखतींमध्ये तिच्या संघर्षाबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. एकदा तिने सांगितले की, जेव्हा ती करिअर करण्यासाठी मुंबईत आली तेव्हा सुरुवातीला तिला फक्त 75-100 रुपये मिळायचे.

अशा परिस्थितीत त्यांची मासिक कमाई पाच हजार रुपये होती. या पैशाचा वापर अभिनेत्रीने तिच्या घराचे भाडे देण्यासाठी आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी केला. अनेकवेळा तिने फक्त वडापाव खाऊन रात्र काढली आहे.

‘पवित्र रिश्ता’मुळे आयुष्य बदललं

त्यानंतर जवळपास 3-4 वर्षांच्या संघर्षानंतर अंकिताला 2009 मध्ये ‘पवित्र रिश्ता’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याच शोच्या माध्यमातून तिची घराघरात ओळख मिळाली.

अंकिताची पर्सनल लाईफची मात्र तिच्या कामापेक्षाही जास्त चर्चा झाली.पवित्र रिश्तामध्ये काम करताना सहकलाकार सुशांत सिंग राजपूतसोबत ती रिलेशनमध्ये होती. तब्बल 7 वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही काळानं त्यांचे ब्रेकअप झाले.

आता जगतेय लक्झरी लाइफ

त्यानंतर अंकिताने 2021 मध्ये करोडपती बिझनेसमन विक्की जैनसोबत लग्न केलं. आज हे स्टार कपल लक्झरी लाइफ जगत आहे. हे दोघेही मुंबईत करोडोंच्या आलिशान घरात राहतात.एका रिपोर्टनुसार अंकिताकडे 30 कोटी रुपयांची मालमत्ता आहे आणि विकी जैनकडे सुमारे 100 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List