डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाणून घ्यायचे आहे? तर हे पाच चित्रपट अवश्य पहा
भीमराव आंबेडकर हे मध्य प्रदेशातील महू गावात राहणारे रामजी मालोजी सपकाळ आणि भिमाबाई सकपाळ यांचे चौदावे अपत्य होते. लहानपणापासूनच आंबेडकरांना ते अस्पृश्य कुटुंबातील असल्याचे सांगण्यात आलं होतं. पण आंबेडकरांनी अशा पोकळ कर्मकांडांकडे नेहमीच दुर्लक्ष केलं. दलितांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात त्यांनी नेहमीच आवाज उठवला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर केवळ हिंदीच नाही तर भारतातील अनेक भाषांमध्ये चित्रपट बनवले गेले आहेत. तुम्हालाही त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर हे पाच चित्रपट नक्की पहा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (2000)
भीमराव आंबेडकर यांना डॉक्टरेट मिळाल्यानंतर लोक त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखू लागले होते. 25 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट हिंदी सोबतच इंग्रजीतही प्रदर्शित झाला होता. मल्याळम चित्रपटाचा सुपरस्टार मामूट्टी यांनी या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी मामूट्टी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाला इंग्रजी श्रेणीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
डॉ. बी आर आंबेडकर (2005)
2005 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बनवलेला चित्रपट डॉ. बी आर आंबेडकर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पण हा चित्रपट हिंदी किंवा मराठीत नसून कन्नड भाषेत बनवण्यात आला होता. अभिनेते विष्णुकांत बीजे यांनी डॉ. बी आर आंबेडकर या चित्रपटामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नड दिग्दर्शक शरण कुमार कब्बूर यांनी केले आहे.
तिसरी आजादी (2006)
2006 साली प्रदर्शित झालेला तिसरी आजादी या चित्रपटात केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरच नाही तर महात्मा फुले यांच्या बद्दल देखील बोलले गेले आहे. जातीव्यवस्थेवर आधारित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे.
भीम गर्जना (१९८९)
भीमगर्जना हा मराठी चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर वाघमारे यांनी केले आहे. हा चित्रपट 1989 मध्ये थिएटरमध्ये मध्ये प्रदर्शित झाला होता. भीम गर्जना हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आहे. या चित्रपटात कृष्णानंद आणि प्रतिमा देवी यासारख्या प्रतिभावान नाट्य कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
बोले इंडिया जय भीम (2016)
2016 साली प्रदर्शित झालेला बोले इंडिया जय भीम हा चित्रपट देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर बनलेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाशिवाय 2018 मध्ये प्रदर्शित झालेला बाळ भिमराव आणि 2011 मध्ये रिलीज झालेला रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्यासारखे बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित असलेले मराठी चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित केवळ चित्रपटच नाही तर अनेक मालिका आणि वेब सिरीजही बनवण्यात आल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List