“आम्हाला बाळ नको होतं”; मूल नको असतानाही राधिकाने बाळाला जन्म का दिला? सांगितलं खास कारण
बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटेनं नुकतंच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ती आई झाली आहे. राधिकाचे गरोदर असतानाचे तिने केलेलं बेबी बंपचे फोटोशूटही सोशल मीडियावर शेअर केले होते.
राधिकाला तिची पर्सनल लाइफ गुप्त ठेवायला आवडते म्हणूनच तिने बाळाबद्दलही लगेच माहिती समोर आणली नव्हती. पण आता राधिकाने बाळ झाल्यानंतर तिचा मातृत्वाचा प्रवास शेअर केला. खरंतर राधिकाच्या एका वक्तव्याने सर्वांनाच धक्क बसला. राधिकाच्या म्हणण्यानुसार तिला कधीच मूल नको होतं.त्यामुळे जेव्हा तिला ती गरोदर असल्याचं समजलं तेव्हा तिला काय वाटलं होतं या भावना तिने व्यक्त केल्या आहेत.
राधिका अन् तिच्या नवऱ्याला मूलं नको होतं
राधिकाने 2012 मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि लोकप्रिय संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. तिचं लग्न झालंय हेही तिच्या जवळच्या लोकांना सोडून फारसं कोणाला माहित नव्हतं. बाळाबद्दल बोलायचं तर राधिका आणि तिचा पती बाळासाठी प्रयत्न करत नसल्याचं सांगत आम्हाला बाळ नको होतं असं राधिकानं म्हटलं होतं.
ती म्हणाली की, “खरं तर मला ते असं सार्वजनिकरित्या सर्वांना सांगायचं नव्हतं, पण मी सर्वांना सांगितलं. मी चुकून गरोदर राहिले नव्हते, पण आम्ही प्रयत्नही करत नव्हतो. त्यामुळे जेव्हा मी गरोदर आहे, असं कळाल्यावर आम्हाला धक्का बसला. कारण आम्ही त्याबद्दल विचारच केला नव्हता,” असं राधिका म्हणाली.
“बाळ हवंय की नाही याचा विचार…”
राधिका पुढे म्हणाली, “मला वाटतं की जेव्हा लोकांना हे माहीत असतं की त्यांना बाळ हवंय की नाही, तेव्हा बाकीच्या गोष्टी सोप्या होतात. पण आमच्या बाबतीत आम्हा दोघांनाही मुलं नको होती, पण मूल झाल्यास ते कसं असेल याची एक टक्का उत्सुकता नक्कीच होती. त्यामुळे मी गरोदर राहिल्यावर आम्ही याबाबत पुढे जावं की नाही, असा प्रश्न आम्हाला पडला होता.” असं म्हणत राधिकाने तिच्या भावना व्यक्त केल्या.
प्रसूतीच्या एक आठवड्याआधी केलं होतं फोटोशूट
राधिकाचे बेबी बंपचे व्हायरल झालेले फोटोशूट हे तिने प्रसूतीच्या एका आठवड्याआधी केलं होतं. याबद्दल तिने म्हटलं आहे की,”बाळाच्या जन्माच्या एक आठवडाआधी मी फोटोशूट केलं होतं. खरंच, त्यावेळी मला माझं शरीर स्वीकारणं कठीण जात होतं. माझं वजन इतकं कधीच वाढलं नव्हतं. माझे शरीर सुजलं होतं. अंग दुखत होतं आणि झोप येत नसल्याने माझे विचार बदलले होते. आता मला आई होऊन दोन आठवडेही झाले नाहीत आणि माझ्या शरीरात पुन्हा बरेच बदल झाले आहेत.”
राधिकासाठी हा प्रवास सोपा नव्हता
पुढे ती म्हणाली “आता मी माझे शरीर स्वीकारले आहे. हे सगळे नवीन अनुभव आहेत. मी नवीन गोष्टी शिकत आहे. माझा दृष्टीकोनही बदलला आहे. आता मी या फोटोंकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते. आता मला या बदलांमध्ये फक्त सौंदर्य दिसत आहे. हे फोटो मला नेहमी लक्षात राहतील,” असं म्हणत राधिकाने तिच्या शरीरातील बदल स्वीकारल्याचं सांगितले आहे.
राधिकाने मागच्या आठवड्यात फोटो शेअर करून लेकीच्या जन्माची माहिती दिली. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लॅपटॉपसमोर बसलेली दिसत आहे. तर तिच्या कुशीत तिची लेक आहे. तिने दिलेल्या कॅप्शनुसार तिचं बाळ एका आठवड्याचं झाल्याचं लक्षात येत आहे. लेकीच्या जन्मानंतर पहिली वर्क मीटिंग असं कॅप्शनही राधिकाने या फोटोला दिलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List