आंबेडकर हयात असते तर त्यांच्यावरही अमित शहांनी ED, CBI ची कारवाई केली असती – संजय राऊत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतील भाषणात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सध्या देशभरात आंदोलनं होत आहेत. संसदेत देखील इंडिया आघाडीने जोरदार निदर्शनं करत अमित शहा यांनी माफी मागावी व राजीनामा द्यावा अशी मागणी केली. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप व अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.
महामानव डॉ. आंबेडकर यांचा अपमान केल्या बद्दल अमित शहा वर दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा अट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करायलाच हवा!
आंबेडकर हयात असते तर त्यांच्यावर देखील ED आणि CBI ची कारवाई करायला शहा यांनी मागेपुढे पाहिले नसते.
आज संसदभवन परिसरात शहा विरोधात निदर्शने केली pic.twitter.com/RLOqElllKj— Sanjay Raut (@rautsanjay61) December 19, 2024
महामानव डॉ. आंबेडकर यांचा अपमान केल्या बद्दल अमित शहा वर दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा अट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करायलाच हवा! आंबेडकर हयात असते तर त्यांच्यावर देखील ED आणि CBI ची कारवाई करायला शहा यांनी मागेपुढे पाहिले नसते, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List