कोणताही पक्ष असो, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना खपवून घेणार नाही, आदित्य ठाकरे यांचा इशारा
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी मुंबईला केंद्रशासित करण्याबाबत वक्तव्य केलं आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ” कोणताही पक्ष असो, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे.
”मुंबई केंद्रशसित करण्याची मागणी निषेधार्ह आहे. काँग्रेस असो वा भाजप. कोणताही पक्ष असो. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना अजिबात खपवून घेणार नाही. मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवला आहे. मुंबई आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List