‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी का अविवाहित? कारण सांगत म्हणाले, ‘माझी भीष्म प्रतिज्ञा…’
Mukesh Khanna On Marriage: अभिनेते मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’ आणि ‘महाभारत’ मालिकेत भीष्म पितामह यांची भूमिका साकारच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मुकेश खन्ना यांनी अनेक भूमिकांना न्याय दिला आहे. पण मुकेश खन्ना फक्त त्यांच्या अभिनयामुळेच नाही तर, परखड वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात. खन्ना अनेकदा असं काही बोलून जातात ज्यामुळे वादग्रस्त परिस्थिती देखील निर्माण होते. पण आता मुकेश खन्ना यांना त्यांच्या लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. वयाच्या 66 व्या वर्षी देखील मुकेश खन्ना अविवाहित आहे. यामागचं कारण देखील त्यांनी नुकताच झालेल्या एका मुलखतीत सांगितलं.
नुकताच झालेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी लग्न आणि रिलेशशिप संकल्पनेवर स्वतःचं मत मांडलं आहे. खन्ना म्हणाले, ‘लग्न एक संस्था आहे… एक बंधन आहे… मी कायम असं मानतो की लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं एकत्र येणं… पण आताच्या काळात लग्न म्हणजे दोन बाहुल्यांचा खेळ आहे. आपण सर्व आत्मा देवाचं हे स्वप्न पूर्ण करण्याची भूमिका बजावत आहे… हे देवाचं एक स्वप्न आहे… तो फक्त एक भ्रम आहे.’
खन्ना पुढे म्हणाले, ‘या जगात आल्यावर तुम्ही आत्मा आहात. अंबानींसारख्या विशिष्ट कुटुंबात जन्म घेतल्याचा अर्थ असा नाही की तुमचे तुमच्या भावंडांसोबत कर्माच्या पलीकडे कोणतंही खोल नातं आहे. भावाला त्या कुटुंबात स्थान मिळू शकतं केवळ त्याच्या कर्मामुळे.’
मुकेश खन्ना यांनी का नाही केलं लग्न?
स्वतःच्या लग्नाबद्दल मुकेश खन्ना म्हणाले, ‘आता देखील मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण असं नाही की मला आवडत नाही. माझ्या नशिबात लग्न नाही. असं काहीही नाही की, मी भीष्प प्रतिज्ञा घेतलेली नाही. या प्रकरणात नियताने माझे नशीब ठरवले आहे.’
कधी लग्न करणार आहात का? यावर मुकेश खन्ना म्हणाले, ‘यावर मी काहीही बोलणार नाही. जर कोणी मुलाखतीत मला असा प्रश्न विचारला तर मी दुर्लक्ष करतो…’ असं देखील मुकेश खन्ना म्हणाले. मुकेश खन्ना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List