2024 मध्ये ‘या’ अभिनेत्यांनी केली राजकारणात एन्ट्री; कोणी मारली बाजी?

2024 मध्ये ‘या’ अभिनेत्यांनी केली राजकारणात एन्ट्री; कोणी मारली बाजी?

अवघ्या काही दिवसांनी वर्ष २०२४ हे संपणार आहे आणि २०२५ या नवीन वर्षाचे स्वागत जगभरात केले जाणार आहे. अशातच चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी हे वर्ष अनेक अर्थांनी खास ठरले आहे. आपल्या चांगल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या कलाकारांनी त्यांच्या विजयाने राजकारणाच्या दुनियेवरही अधिराज्य गाजवले आणि लोकप्रतिनिधी म्हणून नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

कंगना रणौत, अरुण गोविल, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, रवी किशन, सुरेश गोपी, पवन कल्याण यांची नावे राजकारणात जिंकलेल्या कलाकारांच्या यादीत आहेत. स्मृती इराणी यांनीही राजकारणात नशीब आजमावले, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

🛑कंगना रणौत : यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या चित्रपटसृष्टीतील ‘क्वीन’ कंगना रणौत यांनी घवघवीत विजय मिळवला आहे.

🛑अरुण गोविल : ‘रामायण’ चे ‘राम’ अरुण गोविल यांनाही मेरठमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अरुण गोविल हे विजयी होऊन संसदेत पोहचले आहेत.

🛑सुरेश गोपी : दक्षिण भारतीय अभिनेते सुरेश गोपी यांच्यासाठीही हे वर्ष खूप खास राहिले आहे. सुरेश गोपी यांच्या बळावर भाजपला केरळमध्ये शिरकाव करण्यात यश आले. त्यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

🛑हेमा मालिनी : हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री हेमा मालिनी तिसऱ्यांदा मथुरेतून लोकसभेवर निवडून आल्या आहेत. अभिनेत्री भाजप पक्षाच्या खासदार आहेत.

🛑पवन कल्याण : दक्षिण भारतीय अभिनेते पवन कल्याण यांचा पक्ष जनसेना पक्षाने एनडीएअंतर्गत निवडणूक लढवली होती. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी पिठापुरम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

🛑मनोज तिवारी : भोजपुरी अभिनेता आणि गायक मनोज तिवारी हे अभिनयासोबतच राजकारणाच्या दुनियेतीलही एक मोठे स्टार आहेत. तिवारी यांनी ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या कन्हैया कुमारचा पराभव केला.

🛑रव‍ि क‍िशन : भोजपुरी चित्रपटातील आणखी एक सुपरस्टार रव‍ि क‍िशन हे गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले आहेत.

🛑स्मृती इराणी : ‘क्यूंकि सास भी कभी बहू थी’ अभिनेत्री तसेच अमेठीच्या माजी खासदार स्मृती इराणी यांना यावेळी लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. इराणी यांचा काँग्रेसचे उमेदवार केएल शर्मा यांनी पराभव केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“मीच कॅबिनेट..”; कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’चा आणखी एक दमदार ट्रेलर “मीच कॅबिनेट..”; कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’चा आणखी एक दमदार ट्रेलर
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनेक अडथळ्यांना पार करत अखेर...
अखेर तो क्षण आलाच.. ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजे देणार प्रेमाची जाहीर कबुली?
“पुढच्या जन्मी माझे पती बनू नका..”, गोविंदाच्या पत्नीने जोडले हात; संसारात सर्वकाही आलबेल नाही?
तिरुपतीमध्ये भक्तांच्या समूहाला रुग्णवाहिकेची धडक, दोन महिलांचा मृत्यू; तीन जखमी
Photo – मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरेचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाज
मध्य प्रदेशात मंदिरांच्या तोडफोडीवरून वातावरण तापले; सराफा बाजार बंद, हिंदू जैन समाजाचे आरोपप्रत्यारोप
गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका, शरद पवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र