सोनाक्षी सिन्हाचं मोठं वक्तव्य; म्हणाली, ‘महिलांना कायम स्ट्रगल करावं लागतं कारण…’
अभिनेत्रीने केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. सांगायचं झालं तर, सोनाक्षी सिन्हा हिने आभिनेता सलमान खान स्टारर ‘दबंग’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आणि एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आली. सलमान – सोनाक्षीच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण एका मुलाखतीत सोनाक्षीने इंडस्ट्रीतील अनेक गोष्टींवर निशाणा साधला. वयाने मोठी दिसत असल्यामुळे एका अभिनेत्याने सोनाक्षी सोबत काम करण्यास नकार दिला होता.
अशात सोनाक्षी स्वतः म्हणाली होती, असे विचार असलेल्या अभिनेत्यासोबत मला देखील स्क्रिन शेअर करायला आवडणार नाही. इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींवर असलेल्या दबाव बद्दल बोलताना सोनाक्षी म्हणाली, ‘एक गोष्ट स्पष्ट आहे आणि ती म्हणजे ज्या अपेक्षा अभिनेत्रींकडून असतात, त्या अभिनेत्यांकडून नसतात.’
‘अभिनेत्यांना वयाचं बंधन नसतं. जेव्हा ते स्वतःपेक्षा 30 वर्ष लहान अभिनेत्रींसोबत रोमान्स करतात. केस कमी आणि बेली फॅट असेल तरी अभिनेत्यावर टीका केली जात नाही. महिलांना कायम दोष दिला जातो. अनेक अभिनेत्यांना मी सामोरी गेली आहे, ज्यांना मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठी वाटते… अशा अभिनेत्यांचे मी आभार मानते…’ असं देखील सोनाक्षी म्हणाली.
पुढे सोनाक्षी म्हणाली, ‘मला अशा लोकांसोबत स्क्रिन शेअर करायची नाही. कायम यश मिळवण्यासाठी महिलांनी स्ट्रगल करावं लागतं. महिला सर्व अडथळे दूर करतात आणि स्वतःला सिद्ध करुन दाखवतात. आपण सर्व कलाकार आहोत. पण महिलांना अधिक अडचणी असतात.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
सोनाक्षी सिन्हाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये खलनायिकेच्या भूमिकेत सोनाक्षीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्री लवकरच ‘निकिता रॉय एन्ड द बूक ऑफ डार्कनेस’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
सोनाक्षीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने नुकताच अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं आहे. सोशल मीडियावर देखील दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. तब्बल सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर पतीसोबत फोटो पोस्ट करत झहीर याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List