शाहरुख खान मध्यरात्री गौरीपासून लपून-छपून कोणाच्या घरी जायचा? होती फारच खास व्यक्ती, मित्राकडून खुलासा

शाहरुख खान मध्यरात्री गौरीपासून लपून-छपून कोणाच्या घरी जायचा? होती फारच खास व्यक्ती, मित्राकडून खुलासा

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान याच्याबद्दलचे सगळेच फॅन आहेत. त्याच्या अभिनयाचं, त्याच्या मेहनतीचं नेहमीच कौतुक होतं. तसेच त्याच्याबद्दलचे अनेक किस्सेही इंडस्ट्रीत सांगितले जातात. सुनील पाल यांनी एका मुलाखतीत शाहरूख खान संबंधित एक घटना सांगितली होती.

सुनील पाल यांनी सांगितला शाहरूखचा तो किस्सा

शाहरूख खान बरेच महिने मध्यरात्री गौरीपासून लपून-छपून कोणाच्या तरी घरी जायचा. आणि तो असं 4-5 महिन्यांतून असं करायचा. तर तो नेमका कुठे जायचा याच उत्तर कॉमेडियन सुनील पाल यांनी दिलं आहे.

सुनील पाल यांनी सांगितले होते की, शाहरुख खान मध्यरात्री झोपडपट्टी भागात जायचा आणि तो 4-5 महिन्यातून एकदा असं करायचा. शाहरुख मध्यरात्री घरातून निघून झोपडपट्टीत कोणाला तरी भेटायला जायचा. असं सांगत सुनील पाल यांनी त्या व्यक्तीच्या नावाचाही खुलासा केला आहे.

शाहरुख खान मध्यरात्री कोणाला भेटायला जायचा?

शाहरुख खानच्या आयुष्याशी संबंधित एक किस्सा शेअर करताना सुनील पाल म्हणाले की, शाहरुख खान नक्कीच सिनेमाचा सुपरस्टार आहे, पण तो त्याच्या जवळच्या प्रत्येकाची खूप काळजी घेतो आणि तो डाउन टू अर्थ व्यक्ती आहे. सुनील पाल यांनी सांगितले की, “एकेकाळी शाहरुख खान झोपडपट्टीत त्याच्या एका स्टाफ मेंबरला त्याच्या घरी भेटायला जायचा. शाहरुख शांतपणे त्याच्या घरी जायचा आणि 15-20 मिनिटे थांबून परत घरी जायला निघायचा”

शाहरुख खान त्याच्या ड्रायव्हरला भेटायला जायचा

सुनील पाल यांनी पुढे सांगितले की, “त्या व्यक्तीचे नाव सुभाष होते आणि आता तो या जगात नाही. एकेकाळी तो शाहरुख खानचा ड्रायव्हर असायचा. अशा परिस्थितीत तो दर 5-6 महिन्यांनी त्याच्या घरी जात असे, मात्र शाहरुखच्या घरातील कोणालाही याची माहिती नव्हती.”

सुनील पाल यांनी शाहरूखच्या सांगितलेल्या किस्सावरून खरोखच शाहरूख खान हा खऱ्या आयुष्यातही बादशाह आहे हे दिसून येते. तसेच शाहरूख खानला त्याच्याशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीची तेवढीच काळजी आहे हेही या प्रसंगावरून दिसून येते.

शाहरुख खानचा आगामी चित्रपट
शाहरुख खानच्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर, 2023 मध्ये त्याने ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डँकी’ असे तीन जास्त कमाई करणारे चित्रपट दिले. आता शाहरुख खान त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याची लेक सुहाना खानही या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अजितदादांसोबतची बैठक सपंली, भेटीनंतर राजीनाम्यावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर अजितदादांसोबतची बैठक सपंली, भेटीनंतर राजीनाम्यावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. या...
Santosh Deshmukh murder case : आकाच्या आकाचे नाव पहिल्यांदाच समोर, सुरेश धस यांचा मोठा दावा
17 व्या वर्षी लग्न, लग्नापूर्वीच आई, आता 47 व्या वर्षी करतेय दुसरं लग्न; कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री
डायबिटीज असणाऱ्यांनी दिवसभरात किती चपात्या खाव्यात? तज्ज्ञांनी सांगितला महत्त्वाचा सल्ला
लहान मुलांना गुटगुटीत आणि सुदृढ बनवायचंय? ‘या’ पद्धतीनं ड्राय फ्रुट्सचं सेवन करा….
Santosh Deshmukh संतोष देशमुख हत्याप्रकरणी तीन आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
Photo – माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांचे अभिवादन