हिंदुस्थानातून अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बायडन प्रशासनाने H-1B व्हिसाचे नियम केले शिथिल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने H-1B व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत. ज्या अंतर्गत अमेरिकन कंपन्यांना विशेष कौशल्य असलेल्या परदेशी नागरिकांना कामावर घेणं सोपं होणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी F-1 व्हिसा सहज H-1B मध्ये बदलता येणार आहे. या निर्णयामुळे हजारो हिंदुस्थानी तंत्रज्ञान व्यावसायिकांना फायदा होण्याची शक्यता आहे.
सर्वात जास्त मागणी असलेला H-1B व्हिसा हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. ज्या अंतर्गत अमेरिकन कंपन्यांना व्यावसायिक किंवा तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असलेल्या विशिष्ट व्यवसायांमध्ये परदेशी कामगारांना कामावर ठेवण्याची परवानगी आहे.
दरम्यान, तंत्रज्ञान कंपन्या हिंदुस्थान आणि चीनसारख्या देशांमधून दरवर्षी हजारो कर्मचारी नियुक्त करण्यासाठी या व्हिसावर अवलंबून असतात. याचबद्दल बोलताना यूएससीआयएसचे संचालक उर एम. जदौ म्हणाले की, H-1B व्हिसा कार्यक्रम काँग्रेसने 1990 मध्ये तयार केला होता आणि आपल्या देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे.. यासोबतच नवीन नियम 17 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहेत. त्यानंतरच्या सर्व व्हिसा याचिकांमध्ये बिगर स्थलांतरित कामगारांना फॉर्म I-129 ची नवीन आवृत्ती दाखल करणे आवश्यक असेल. DHS, USCIS द्वारे, प्रति वर्ष 65,000 H-1B व्हिसा जारी करण्याचा कायदेशीर अधिकार आहे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List