राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार? यादी फुटली?; ‘ते’ खातं मिळवण्यात अजितदादा यशस्वी?

राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार? यादी फुटली?; ‘ते’ खातं मिळवण्यात अजितदादा यशस्वी?

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप आज किंवा उद्या होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रीही आपल्याला कोणतं खातं मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही आपल्याला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता लागली आहे. शिवसेनेने गृहखात्यासाठी बराच आटापिटा केला. पण त्यांच्या पदरी निराशा आली. तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडचं अर्थ खातं फडणवीस स्वत:कडे ठेवणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे अजितदादांकडे अर्थ खातं राहणार की नाही असं बोललं जात होतं. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ खातं अजितदादांकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे जुनीच खाती येणार आहेत. त्यांना एकच नवं खातं दिलं जाणार आहे. मात्र खात्यात अदलाबदलीही होणार नसल्याचं सांगण्यात आलं. अर्थ आणि नियोजन, महिला आणि बालकल्याण, कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि बंदरे, मदत पुनर्वसन, अन्न नगरी पुरवठा आणि अन्न औषध प्रशासन ही खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यात राज्य उत्पादन शुल्क हे खाते नव्याने राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या खाते वाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कुणाला कोणतं खातं मिळणार?

राष्ट्रवादीत मकरंद पाटील यांना सहकार खातं मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादा स्वत:कडे अर्थ आणि नियोजन खातं ठेवणार आहेत. तर आदिती तटकरे यांना महिला आणि बालकल्याण खात्याची जबाबदारी दिली जाणार आहे. दत्ता मामा भरणे यांच्याकडे कृषी, तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपद दिलं जाणार आहे. तसेच हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शिवाय राष्ट्रवादीला राज्य उत्पादन शुल्कही दिलं जाणार आहे. अजित पवार हे खातं स्वत:कडे ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शिवसेनेला जुनीच खाती?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जुनीच खाती दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं असणार आहे. त्यासोबत त्यांच्याकडे आणखी कोणतं खातं असणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय गृह खातं कुणाकडे जाणार हे सुद्धा अजून गुलदस्त्यात असल्याने त्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुणे – मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार! पुणे – मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार!
पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळात किमान अर्ध्या तासाचा फरक पडणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम जवळपास 90 टक्के...
आव्हाडांवर सरकारची पाळत, पोलिसांनी पत्रकार परिषदेत घुसून केले शूटिंग
लक्षवेधी – ‘ब्लिंकिट’ची 10 मिनिटांत अ‍ॅम्ब्युलन्स सेवा
मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय एसआयटीच्या अहवालानंतर, राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
एटीकेटी-कॅरी ऑनचा विषय अ‍ॅकेडमिक कौन्सिलसमोर मांडणार, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा कहर, चीनमध्ये वैद्यकीय आणीबाणी जाहीर
अबब! दिवसाला 48 कोटी पगार, हिंदुस्थानी वंशाच्या सीईओची थक्क करणारी कमाई