मुंबईत 31 डिसेंबरपूर्वी एनसीबीची मोठी कारवाई, 15 कोटींचे ड्रग्स जप्त, चक्क एका फ्लॅटमध्ये…

मुंबईत 31 डिसेंबरपूर्वी एनसीबीची मोठी कारवाई, 15 कोटींचे ड्रग्स जप्त, चक्क एका फ्लॅटमध्ये…

नवीन वर्षाच्या आगमनास काही दिवस राहिले आहे. तरुणाई नवीन वर्षांच्या स्वागतासाठी उत्सुक असते. यामुळे ३१ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर दारुची विक्री होत असते. तसेच अनेक ठिकाणी ड्रग्सही विकले जाते. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमिवर अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) विभाग सक्रीय झाला आहे. एनसीबीने मुंबईत मोठी कारवाई करत ५ कोटी २० लाखांचे ड्रग्स जप्त केले आहे. दोन कारवाईत हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.

फ्लॅटमध्ये गांजाची लागवड

मुंबईतल्या एका फ्लॅटमध्ये गांजाची झाडे उगवून त्यातून त्याची तस्करी होत असल्याचेही समोर आले होते. एनसीबीला डार्क वेबच्या माध्यमतून ही गांजा तस्करी होत असल्याचे समजले. त्यानंतर एनसीबीने छापा टाकून मुंबईतून आरोपीला अटक केली आहे.

काय असते डार्क वेब

डार्क वेब ओनियन राउटिंग तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामुळे युजरजी गोपनीयता कायम ठेवली जाते. या तंत्राचे वापर करणाऱ्या युजरला ट्रॅक करता येत नाही. डार्क वेब अनेक आयपी ऍड्रेसमधून कनेक्ट आणि डिस्कनेक्ट होते, ज्यामुळे ट्रॅक करणे अशक्य होते. बिटकॉइन सारख्या आभासी चलनाचा वापर डार्क वेबवर व्यवहार करण्यासाठी केला जातो.

दुसरी कारवाई विमानतळावर

एनसीबीने दुसऱ्या कारवाईत मुंबई विमानतळावर थायलंडमधून भारतात येणारे ड्रग्स पकडले. या तस्करीत मोठे रॅकेट असल्याचे उघडकीस आले आहे. थायलंडमधून बँकॉक आणि नंतर मुंबईत आलेले ड्रग्सचे पार्सल एनसीबीने पकडले आहे. त्यातून १३ किलो हायब्रिड स्ट्रेन गांजा सापडला आहे. या गांजाची तस्करी करण्यात कोल्हापूरची एक व्यक्ती असल्याचे समोर आले. त्या संशयित व्यक्तीला एनसीबीने अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या कारवाईत १५ कोटी २० लाखांचे ड्रग्स जप्त झाले.

काही दिवसांपूर्वी नवी मुंबई शहरामध्ये बारा कोटी रुपयांचा ड्रग्स जप्त करण्यात आले होते. नवी मुंबई गुन्हे शाखाने विविध भागात 25 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या अंतर्गत 13 नायजेरियन लोकांना पोलिसांनी घेतले. तसेच तीन नायजेरियनकडे कागदपत्रे नसल्याने त्यांना ताब्यात घेतले होते. नायजेरियनकडून पोलिसांनी बारा कोटी रुपयांचे ड्रग्स मिळाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

PM मोदी आज 38 मिनिटे बोलले, त्यातले 29 मिनिटे त्यांनी दिल्लीतील जनतेला शिव्या दिल्या – अरविंद केजरीवाल PM मोदी आज 38 मिनिटे बोलले, त्यातले 29 मिनिटे त्यांनी दिल्लीतील जनतेला शिव्या दिल्या – अरविंद केजरीवाल
पंतप्रधान दिल्लीच्या जनतेला दररोज शिवीगाळ करत आहेत, दिल्लीच्या जनतेचा अपमान करत आहेत, दिल्लीची जनता भाजपला या अपमानाचे उत्तर निवडणुकीत देईल,...
Eknath Shinde Threat: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल
मुंबईकरांना मिळणार सर्वत्र मेट्रो प्रवासाचा आनंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड गाणं; महेश बाबूच्या बायकोचा बाथरूममधील ‘तो’ सीन पाहाताच वाटते लाज, लोक बदलतात चॅनल
स्वतंत्र हिंदुस्थानात RBI ने सर्वातआधी जारी केली होती ‘ही’ नोट, जाणून घ्या नोटेवर कोणाचा छापण्यात आला होता फोटो
Affordable Maruti Brezza – मारुती ब्रेझाची किंमत होऊ शकते कमी, लहान इंजिनसह येईल नवीन मॉडेल
टीव्ही मालिका पाहून तांत्रिकाने दोघांचा काटा काढला, पण तिसऱ्याला संपवण्याच्या तयारीत असतानाच पर्दाफाश