लक्षवेधक – कॅनडाच्या उपपंतप्रधान क्रिस्टियांचा राजीनामा
कॅनडाच्या उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री क्रिस्टिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांना गेल्या शुक्रवारी अर्थमंत्री पद सोडून दुसऱया मंत्रालयाची जबाबदारी घेण्यास सांगितले होते. यामुळे संतापलेल्या क्रिस्टिया यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड या कॅबिनेट कमिटी ऑन यूएस रिलेशनच्या अध्यक्षा होत्या. ही समिती अमेरिकेचे संबंध सुधारण्यासाठी आणि प्रकरणे सोडवण्यासाठी काम करते.
श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके बोधगयेत!
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी मंगळवारी बिहारमधील बोधगया मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी पूजाअर्चा करत पवित्र बोधीवृक्षाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विदेश मंत्री हेराथ आणि उपअर्थमंत्री अनिल जयंता यांच्यासह महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाचे महासचिव भंते पी सिवली थेरो, बीटीएमसीचे सचिव डॉ. महाश्वेता महारथी आदी उपस्थित होते. श्रीलंकेचे राष्ट्रपती हे दोन दिवसांपूर्वीच हिंदुस्थान दौऱयावर आले असून त्यांनी पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेतली आहे.
रॅपर बादशाहला 15 हजार रुपयांचा दंड!
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुरुग्रामच्या ट्रफिक पोलिसांनी प्रसिद्ध रॅपर बादशाहला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला. चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, गाडीत मोठय़ा आवाजात गाणी लावणे आणि निष्काळजीपणाने वाहन चालवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पंजाबी गायक करण औजलाच्या कॉन्सर्टसाठी बादशाह येथील सोहाना रोडवरील एअरिया मॉलमध्ये 15 डिसेंबर रोजी आला होता, असे अधिकाऱयाने सांगितले. ‘महिंद्रा थारमधून बादशाह प्रवास करत होता. ही गाडी पानिपत येथील रहिवासी दीपेंद्र मलिक यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List