मुंबईत प्रदूषणाची आणीबाणी, हायकोर्टाने व्यक्त केली चिंता; वाहतूककोंडीमुळे हवेची गुणवत्ता खालावली

मुंबईत प्रदूषणाची आणीबाणी, हायकोर्टाने व्यक्त केली चिंता; वाहतूककोंडीमुळे हवेची गुणवत्ता खालावली

मुंबईची हवा अत्यंत खराब झाली असून आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे, अशी गंभीर चिंता उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केली. वाहतुकीचे योग्य प्रकारे नियमन होत नसल्यानेच हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. पश्चिम द्रुतगती मार्गावर जरा जाऊन बघा हजारो गाड्यांच्या रांगा लागलेल्या असतात. या गाड्या सतत धूर फेकत असतात. याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असते. याकडे आता लक्ष दिले नाही तर भविष्यात परिस्थिती अत्यंत गंभीर होईल. वाहतुकीचे नियमन योग्य प्रकारे कसे होईल यासाठी ठोस उपाय योजना करा, असे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य शासनाला सांगितले.

मुंबईतील प्रदूषणाचा मुद्दा न्यायालयाने स्युमोटो सुनावणीसाठी दाखल करून घेतला आहे. खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील 1310 रिक्त जागा भरल्या की नाहीत, अशी विचारणा न्यायालयाने केली. यातील काही जागा मंजूर केल्या आहेत. भरतीसाठी त्याची जाहिरात दिली आहे, अशी माहिती सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी खंडपीठाला दिली.

त्यावर न्यायालय संतप्त झाले. एका महिन्यात रिक्त जागा भरल्या जातील अशी हमी तुम्ही दिली होती. अजून त्या जागा का भरल्या गेल्या नाहीत. या जागा भरण्यासाठी काय केले जाणार आहे याची माहिती शपथपत्रावर सादर करा, असे आदेश राज्य शासनाला देत खंडपीठाने ही सुनावणी 9 जानेवारी 2025 पर्यंत तहकूब केली.

टोल नाक्यांचे बॅरिकेडस् काढून टाका

छोट्या वाहनांना टोल मुक्ती देण्यात आली आहे. तरीही टोल नाक्यांवर बॅरिकेडस् आहेत. तेथे वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे वायू प्रदूषण होते. हे टाळणे शक्य आहे. हे सर्व बॅरिकेडस् काढून टाका. छोट्या वाहनांचा मार्ग मोकळा करा. केवळ अवजड वाहनांसाठी टोल असल्याने त्यांच्यापुरतेच बॅरिकेडस् लावा, अशी सूचना न्यायालयाने केली. एमएमआरडीए सोबत चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त सरकारी वकील चव्हाण यांनी स्पष्ट केले.

वांद्र्याहून विमानतळ गाठायला दीड तास लागतो

मरीन ड्राईव्ह येथून कोस्टल रोडने सी-लिंकद्वारे वांद्र्याला तत्काळ पोहोचता येते. पण तेथून विमानतळ गाठायला दीड तास लागतो. बोरिवलीला जायला तासंतास लागतात. हेच आहे का तुमचे वाहतुकीचे नियमन, असे खडेबोल न्यायालयाने वाहतूक पोलिसांना सुनावले.

मेट्रोच्या कामामुळे वायू प्रदूषण

पश्चिम उपनगरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामामुळे सर्वत्र धूळ पसरते. वाहतूककोंडी होते. प्रदूषण होते. याची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार होत नाही. या प्रदूषणासाठी कोणाला तरी जबाबदार धरायला हवे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

भविष्याचे सांगू नका, आताचे सांगा

कोस्टल रोडमुळे वांद्र्यापर्यंत सहज जाता येते. त्यापुढील कोस्टल रोडचे काम सुरू आहे. त्याचा नक्कीच फायदा होईल, असे सांगण्याचा पालिकेने प्रयत्न केला. यावर न्यायालय संतप्त झाले. भविष्याचे सुख आम्हाला सांगू नका. आता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचे स्पष्टीकरण द्या. प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ते आटोक्यात आणा, असे खंडपीठाने पालिकेचे कान उपटले. औद्योगिक प्रदूषणाकडे लक्ष द्या, असेही न्यायालयाने पालिकेला सांगितले.

मरीन ड्राइव्हच्या इमारती दिसत नाहीत

मरीन ड्राइव्हच्या इमारती दिसत नाहीत एवढे प्रदूषण वाढले आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तुमचे अधिकारी कामाला लागतात, असे न्यायालयाने राज्य शासनाला सुनावले. सध्या सर्व अधिकारी हिवाळी अधिवेशनामुळे नागपूरला आहेत, असे अतिरिक्त सरकारी वकील चव्हाण यांनी न्यायालयाला सांगितले. सर्व अधिकारी तेथे असतील तर कोर्टदेखील नागपूरलाच भरवा, असे न्यायालयाने फटकारले. तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा नागपूरला गेलात तर मुंबईला विसरू नका, असा सल्ला न्यायालयाने शासनाला दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“21 लाखांचं बक्षीस देईन जर मुलीच्या बॉयफ्रेंडला..”; बिग बॉसच्या निर्मात्यांना चाहत पांडेच्या आईचं खुलं आव्हान “21 लाखांचं बक्षीस देईन जर मुलीच्या बॉयफ्रेंडला..”; बिग बॉसच्या निर्मात्यांना चाहत पांडेच्या आईचं खुलं आव्हान
‘बिग बॉस’चा अठरावा सिझन चांगला चांगलाच गाजतोय. सूत्रसंचालक सलमान खानचा हा सर्वांत वादग्रस्त रिअॅलिटी शो त्यातील हाय-व्होल्टेज ड्रामासाठी सतत चर्चेत...
अभिनेत्रीने लेकींसाठी सोडली मायानगरी; मुंबईपासून दूर ‘या’ ठिकाणी करतेय संगोपन, सांगितलं खास कारण
सतत रडत बसायची गरज काय? ‘बिग बॉस 18’मधील शिल्पा शिरोडकरबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?
श्वास कोंडतो, बर्ड फ्ल्यू सारखी लक्षणं… चीनमधील HMPV डेंजर व्हायरसची लक्षणे काय?; जाणून घ्या, सतर्क व्हा
बंगळुरूत HMPV चा पहिला रुग्ण, आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
सावधान… लहान मुलं आणि ज्येष्ठांनाच या व्हायरसची लागण, चीनच्या खरतनाक HMPV भारतात एन्ट्री, पहिला रुग्ण सापडला
अनियंत्रित बस दरीत कोसळली, चार प्रवाशांचा मृत्यू; अनेक जण जखमी