भाजप ही नटरंगी नार, नौटंकी करण्यासाठी त्यांना पुरस्कार मिळायला हवा; संजय राऊत यांचा घणाघात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून संसदेबाहेर मोठा गोंधळ झाला. अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांना भाजप खासदारांनी अडवल्यामुळे संसदेबाहेर धक्काबुक्की झाली. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ”काल मी संसदेबाहेर राहुल गांधींसोबतच होतो. आम्ही सर्व संसदेत गेलो. मी या प्रताप सारंगींना ओळखतो. अशा नौटंकी करण्यात ते पुढे असतात. भाजप ही नाट्य शाळा आहे. नटरंगी नार आहे ही. असे ड्रामा करण्यात भाजपला पुरस्कार मिळायला हवा. त्यांचे नाटक लवकरच बंद होईल”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
”महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबात अमित शहा अपशब्द काढतात. हा सत्तेचा गैरवापर. त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या राजकीय पक्षांवर हल्ले केले जातात ही सत्तेची मस्ती आहे. इतिहासात अनेक दाखले आहेत की असे मस्तवाल लोकं नष्ट झालेले आहेत. आम्ही संविधान वाचवण्यासाठी झगडतोय. आमच्यावर हल्ला करायला त्यांचे शंभर बाप खाली उतरायला पाहिजे. मी दिल्लीत एकटा असतो. आमची सर्व सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. आम्ही काही भिक मागत बसलो नाही. हिंमत असेल तर या अंगावर. मराठी माणसांवर हल्ल्यांना सुरुवात झाली आहे. ही त्यांची सुरुवातच त्यांचा अंत आहे. मराठी माणसावरील हल्ल्यांची ही सुरुवात मस्तवाल भाजपच्या अंताची सुरुवात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List