इराणमध्ये नवीन हिजाब कायद्यावर बंदी, हात-पाय उघडे दिसल्यास महिलांना 15 वर्षांचा तुरुंगवास
इराणमधील वादग्रस्त हिजाब कायद्यावर बंदी घालण्यात आली. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने हा निर्णय घेतला. हा कायदा गेल्या शुक्रवारपासून अमलात येणार होता, मात्र देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या कायद्याला विरोध वाढल्याने यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कायदा अस्पष्ट आहे आणि अजूनही यात सुधारणांची गरज आहे, असे इराणचे अध्यक्ष मसूद पजशकियान यांनी म्हटले आहे.
या कायद्यानुसार केस, हात आणि पाय पूर्णपणे न झाकणाऱ्या महिलांना 15 वर्षे तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. महिला गायिका परस्तु अहमदीला गेल्या आठवड्यात कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर हिजाब कायद्याबाबतची चर्चा अधिक तीव्र झाली होती. परस्तु अहमदी यांनी 11 डिसेंबर रोजी या मैफलीचा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केला. या व्हिडीओमध्ये अहमदी स्लीव्हलेस ड्रेस घालून गाणे म्हणत होत्या. हा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर न्यायालयात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List