मजरूह सुलतानपुरी यांना ‘मोहम्मद रफी जीवनगौरव’
1950-60 च्या दशकांमधील लोकप्रिय गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना या वर्षीचा ‘मोहम्मद रफी जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला. तर प्रसिद्ध गायक जावेद अली यांना ‘मोहम्मद रफी पुरस्कार’ देण्यात येणार आहे. 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा येथे होणाऱ्या सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल.
मजरूह सुलतानपुरी यांना मरणोत्तर जीवनगौरव देण्यात येणार असून त्यांचे चिरंजीव अंदलिब मजरूह सुलतानपुरी हे पुरस्कार स्वीकारतील. एक लाख रुपयाचा धनादेश, स्मृतिचिन्ह असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून 51 हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.
मोहम्मद रफी यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या ‘स्पंदन’ संस्थेतर्फे संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवनगौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदाचे वर्ष हे मोहम्मद रफी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. तसेच पुरस्काराचे हे 18 वे वर्ष आहे. यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे ‘फिर रफी’ ही बहारदार मैफल सादर होईल. याअंतर्गत गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List