आज वर्षातील सर्वात छोटा दिवस अन् मोठी रात्र
उद्या, शनिवारी वर्षातील सर्वात लहान दिवस असणार आहे. दिवस अवघ्या पावणेअकरा तासांचा राहणार असून रात्र मात्र सवातेरा तासांची असणार आहे. वर्षांत दोन दिवस सूर्य निश्चित ठिकाणी उगवतो. त्याला विषुवदिन असेही म्हणतात. सर्वात लहान दिवसाला अयन दिन असेही म्हणतात. या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धाकडे झुकलेला असल्याने त्या भागात उन्हाळा आणि उत्तर गोलार्धात हिवाळा हा ऋतू असतो. दक्षिण ध्रुवावर दीर्घ कालावधीची रात्र आणि उत्तर ध्रुवावर दीर्घ कालावधीचा दिवस सुरू होतो. या दिवसापासून सूर्याचा प्रवास मकरवृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत सुरू होऊन 21 जूनपर्यंत चालतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List