पत्नीशी भांडताना सहा महिन्यांच्या मुलीला चुकून सहाव्या मजल्यावरून फेकले, पित्याला चार वर्षांचा तुरुंगवास
पती-पत्नीच्या भांडणामुळे एका सहा महिन्यांच्या चिमुकलीचा नाहक जीव गेल्याची घटना चीनमध्ये उघडकीस आली आहे. मुलीला सांभाळण्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. भांडताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पतीने चुकून मुलीला सहाव्या मजल्यावरून खाली फेकले. मुलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पित्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली.
पश्चिम चीनमधील शिनजियांग उईगुर स्वायत्त प्रदेशातील एका न्यायालयाने चिमुरडीच्या वडिलांना हत्येप्रकरणी दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपी पित्याला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
पत्नी घरकामात व्यस्त होती. यादरम्यान सहा महिन्यांची चिमुकली रडत होती. मात्र आरोपीने मुलीकडे दुर्लक्ष केले. यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. भांडत असताना आरोपीने मुलीला हातात घेतले आणि खिडकीजवळ नेले. यावेळी चुकून सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधून मुलगी खाली पडली. आरोपीने तात्काळ मुलीला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पत्नीने दिलेल्या माहितीनंतर रुग्णालयाने पोलिसांना बोलावले. न्यायालयात पत्नीने साक्ष देताना म्हटले की, पती रोज दारु प्यायचा, मात्र मुलीची काळजी घ्यायचा. यानंतर न्यायालयाने आरोपी हत्येऐवजी मनुष्यवधासाठी दोषी असल्याचा निष्कर्ष काढला. निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याने न्यायालयाने वडिलांना चार वर्षांची शिक्षा सुनावली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List