जयपूरमध्ये CNG गॅसने भरलेल्या टँकरचा भीषण अपघातानंतर स्फोट, पाच ठार; 24 जखमी
राजस्थानची राजधानी जयपूर शुक्रवारी सकाळी एका मोठ्या स्फोटाने हादरली. CNG गॅस भरून घेऊन जाणाऱ्या एका टँकर व एका ट्रॅकची जयपूर अजमेर महामार्गावर धडक झाली. या धडकेनंतर टँकरचा स्फोट झाला असून यात पाच जण ठार तर 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या वीसहून अधिक गाड्यांनी पेट घेतला.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या वीस गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान ज्या ट्रॅकने टँकरला धडक दिली त्यात देखील रासायिक पदार्थ होते त्यामुळे ही आग जास्त झपाट्याने पसरल्याचे समजते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List