वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा; छगन भुजबळांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर व्यक्त केला संताप

वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा; छगन भुजबळांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर व्यक्त केला संताप

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले असून त्यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला होता. आता येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी थेट अजित पवार यांच्याबाबत संताप व्यक्त केला आहे. वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुकही केले. शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यावेळी मी त्यांच्यासोबत राहिलो. शरद पवारांनी मला उपमुख्यमंत्रीपद दिले, गृहमंत्री बनवले, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी थेट अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला. लोकसभेवेळी अमित शहा यांनी सांगितले की नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांनी लढवावी. तीन आठवडे नाव जाहीर केले नाही. त्यानंतर मी नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले. त्यावेळी अजित पवार बोलले भुजबळांनी घाई केली, मग इतके दिवस का नाही सांगितले? मी दूध पिता बच्चा आहे का? मला कळत नाही का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

आता मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत बोलत आहेत. हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले, त्यांना मी काय तोंड काय दाखवू. त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का? हा काही पोरखेळ आहे का? माझ्या मनात मंत्रीपदाबाबत शंका होती, अन् त्याप्रमाणे झाले. माझी जर किंमत नसेल तर काय उपयोग? दादाचा वादा. वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोटरमनला आवश्यक सुविधा पुरवा! रेल कामगार सेनेने घेतली मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांची भेट मोटरमनला आवश्यक सुविधा पुरवा! रेल कामगार सेनेने घेतली मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांची भेट
रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांची भेट घेतली. यावेळी रात्रंदिवस काम करणाऱ्या मोटरमनना आवश्यक...
अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय हवेय? सूचना पाठवा, पालिकेचे आवाहन
शरद पवार भुजबळांची वाट पाहत दीड तास थांबले
शासकीय बैठकीला राज्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या लेकी’ची उपस्थिती सरकारी अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता
रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार; मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टर योजना
मुंबईत पहाटे गारवा, दिवसा लाहीलाही; कमाल तापमानात 6 अंशांची वाढ
रवींद्र नाट्य मंदिरमध्ये लवकरच तिसरी घंटा; फेब्रुवारीअखेरपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे निर्देश