287 रुग्णांची विनामूल्य तपासणी
माता यशोदा संस्थेच्या वतीने स्व. यशोदा रामचंद्र हरचांदे यांच्या 20 व्या स्मृतिदिनी श्रीकृष्ण हरचांदे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचपोकळी येथे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर झाले. शिबिराचे उद्घाटन नाकोडा धाम ट्रस्ट मंडळाचे सचिव दिनेश जैन यांच्या हस्ते व अरुणा हरचांदे यांच्या उपस्थितीत झाले. या शिबिरात 287 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबिरात डॉ. लहाने’ज रघुनाथ नेत्रालय आय केअर अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने प्रख्यात नेत्रसर्जन ‘पद्मश्री’ डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण डोळय़ांची संगणकीय मशीन तसेच मॅन्युअली उपकरणांनी नजर तपासणे, चष्म्याचा नंबर काढणे, मोतीबिंदू तपासणी, डोळय़ांचा पडदा तपासणी करण्यात आली. रेटिना सर्जन डॉ. सायली लहाने-वाघमारे, नेत्र सर्जन डॉ. सुमित लहाने, लहान मुलांच्या डोळय़ाच्या सर्जन डॉ. शीतल लहाने, डॉ. म्रितिका लहाने तसेच रेडिओलोजिस्ट डॉ. अरविंद जैन, कान-नाक-घसा सर्जन डॉ. दीपक देसाई, डेंटल सर्जन डॉ. प्रियांका वडांबे, फिजिशियन्स डॉ. विलास वडांबे, कार्डिओलोंजिस्ट डॉ. विघ्नेश राणे, डॉ. अमी देसाई-पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List