Sindhudurg News – 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटने मारली बाजी
जिल्हा परीषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कणकवली आयोजित आणि फोंडाघाट एज्यूकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या 52 व्या तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शनमध्ये न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटने बाजी मारली.
विज्ञान प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये दिव्यांग विध्यार्थी प्रतिकृती माध्यमिक गटात- रावराणे दिव्येश हेमंत प्रथम, तर प्राथमिक गटात भोवड रुद्र राजन याने प्रथम क्रमांक मिळविला. विज्ञान विद्यार्थी प्रतिकृती माध्यमिक गटात- कु. वेंगुर्लेकर जागृती सुभाष हिने द्वितीय क्रमांक पटकाविला तसेच शिक्षक प्रतिकृती माध्यमिक गटात राठोड विजयकुमार पांडुरंग यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक गटात कु. बोबकर हार्दिका दशरथ हीने प्रथम क्रमांक तर निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात कु. रासम आर्या अविनाश हिने तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष महेश सावंत सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार विठोबा तायशेटे, सर्व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक रासम व्ही व्ही, पर्यवेक्षक पारकर पी के, सर्व शिक्षक वर्ग, ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List