आज ‘राजगृह ते चैत्यभूमी’ मार्च
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे वक्तव्य केले. या वक्तव्याचा आणि परभणीतील दडपशाहीचा निषेध करण्यासाठी मुंबईत शनिवार, 21 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता ‘राजगृह ते चैत्यभूमी’ असा मार्च काढण्यात येणार आहे.
या मार्चमध्ये प्रागतिक रिपब्लिकन आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समन्वय समिती, लाल निशाण (लेनिनवादी), कम्युनिस्ट पक्ष (माले) लिबरेशन, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, संविधान संवर्धन समिती, लोकांचे दोस्त, आंबेडकरी स्त्री संघटना, राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलन, वाघिणी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सहभागी होणार आहेत. मार्चमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शामदादा गायकवाड, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. राजू कोरडे, कॉ. अजित पाटील, सुबोध मोरे, उर्मिला पवार, राहुल गायकवाड, शाहीर संभाजी भगत यांनी केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List