अवघ्या काही तासांवर शपथविधी, कुणाला लागणार लॉटरी, रात्रभर लॉबिंग, कुणाकुणाला फोन, कुणाचा पत्ता कट?

अवघ्या काही तासांवर शपथविधी, कुणाला लागणार लॉटरी, रात्रभर लॉबिंग, कुणाकुणाला फोन, कुणाचा पत्ता कट?

बहुमताच्या लाटेवर स्वार महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. नागपूरमध्ये उद्यापासून हिवाळी अधिवेशनाचा श्रीगणेशा होत आहे. त्यापूर्वीच अवघे सरकार आज नागपूरमध्ये दाखल होत आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागवी आणि मंत्रीपदाची माळ गळ्यात पडावी यासाठी रात्रभर लॉबिंग करण्यात आले. शिवसेनेच्या 12 मंत्र्यांची नावं आता अंतिम झाली आहे. तर भाजपच्या आमदारांना आता फोन गेल्याची माहिती समोर येत आहे. नितेश राणे, शिवेंद्रराजे, मंगलप्रभात लोढा यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेत कुणाला लॉटरी

महाराष्ट्र कॅबिनेट विस्ताराची वेळ आता जवळ आली आहे. एकना शिंदे यांच्या शिलेदारांची नावं सुद्धा अंतिम झाल्याचे समोर येत आहे. शिवसेनेत काही जणांचा पत्ता कट झाल्याचे तर काही जुन्या लोकांना पुन्हा संधी देण्यात आल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे 12 आमदार शपथ घेतील. यामध्ये 6 नवीन चेहऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या 6 नवीन चेहऱ्यांना संधी

मराठवाडा छत्रपती संभाजीनगरमधून संजय शिरसाट

रायगडमधून भरतशेठ गोगावले

पश्चिम महाराष्ट्रातून प्रकाश अबिटकर

कोकणातून योगेश कदम

विदर्भातून आशिष जैस्वाल

ठाण्यातून प्रताप सरनाईक

या पाच जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी

कोकणातून उदय सामंत

पश्चिम महाराष्ट्रातून शंभुराज देसाई

उत्तर महाराष्ट्रातून गुलाबराव पाटील

उत्तर महाराष्ट्रातून दादा भुसे

विदर्भातून संजय राठोड

या तिघांचा पत्ता कट

कोकणातून दीपक केसरकर

मराठवाडा धाराशिवमधून तानाजी सावंत

मराठवाडा छत्रपती संभाजीनगरचे अब्दुल सत्तार

योग्य व्यक्तींना संधी देण्यात येईल

धक्कातंत्र आहेत की नाही याची माहिती लवकरच मिळेल. याविषयी आमदारांना फोन जातील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. योग्य काम करणाऱ्या व्यक्तींना संधी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. चार वाजता मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या या नेत्यांना लॉटरी

नव्या सरकारच्या मंत्र्यांच्या शपथवधी नागपूरात आज संध्याकाळी होत आहे. उद्यापासून हिवाळी अधिवेशन होत आहे. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही नेत्यांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. अजित पवार गटाकडून चार आमदारांना फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, आदिती तटकरे, अनिल पाटील यांना सुनील तटकरे यांनी फोन केल्याचे समजते. हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती समोर येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या समुद्रात पुन्हा बोट अपघात, मोठ्या जहाजाची बोटीला धडक, मध्यरात्री खोल समुद्रात बचावाचा थरार मुंबईच्या समुद्रात पुन्हा बोट अपघात, मोठ्या जहाजाची बोटीला धडक, मध्यरात्री खोल समुद्रात बचावाचा थरार
Mumbai Boat Accident : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणाऱ्या एका प्रवासी बोटीचा भीषण अपघात झाला होता. भारतीय नौदलच्या...
‘अटक तर सोडाच तुम्ही वाल्मिकी कराड साहेबांना साधी नोटीसही…’, सदावर्तेंचं मोठं वक्तव्य; धस यांना थेट आव्हान
सलमानने घातलेलं हिरेजडित घड्याळ जगात फक्त 18 लोकांकडेच ;किंमत वाचून धक्का बसेल
पत्रकार परिषदेनंतर प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे कमेंट्स; ‘कुणीही उठून स्त्रियांच्या चारित्र्यावर..’
अपघातात उर्मिला कोठारेच्या कारचा चक्काचूर; घटनास्थळावरील कारचे फोटो व्हायरल
शेतातील धान्यलक्ष्मीची पूजा करण्याचा दिवस येळवस; जाणून घ्या प्रथा…
64 घरांची राणी! बुद्धिबळात कोनेरू हम्पीने रचला इतिहास, पटकावला World Rapid Chess Championship किताब