फायनान्स कंपनीच्या छळाला कंटाळून तरुणाने जीवन संपवले

फायनान्स कंपनीच्या छळाला कंटाळून तरुणाने जीवन संपवले

एमएएस फायनान्स कंपनीच्या छळाला कंटाळून 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रथमेश देसाई असे मृत तरुणाचे नाव आहे. फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी उरण पोलिसांकडे केली आहे.

उरण तालुक्यातील करंजा-सुरकीचा पाडा येथे देसाई कुटुंब राहतात. आई वृषाली एका खासगी शाळेत कर्मचारी आहे, तर वडील विलास वृत्तपत्र विक्रेते आहेत. त्यांचा मोठा मुलगा गणपती कारखान्यात आणि प्रथमेश खासगी बंदरात काम करीत होता. वृषाली यांनी प्रथमेशला एमएएस फायनान्स सर्व्हिस या कंपनीतून लोन घेऊन दुचाकी घेतली. 2022 मध्ये घेतलेल्या गाडीचे 16 हप्तेही नियमित भरले. त्यानंतरचे शिल्लक राहिलेले काही हप्ते थकले होते. त्यामुळे फायनान्स कंपनीचे एजंट फोन करून हप्त्यासाठी प्रथमेशकडे सारखा तगादा लावत होते. तसेच सतत घरी अपमानित करून धमकी देत होते. या छळाला कंटाळून प्रथमेशने आत्महत्या केली. तरुणाच्या नातेवाईकांनी उरणच्या पोलीस ठाण्यात एमएएस फायनान्स सर्व्हिस कंपनीविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?