एसआरएच्या रखडलेल्या प्रकल्पांना शिवशाही देणार गती
विविध कारणास्तव रखडलेले एसआरएचे काही प्रकल्प आता शिवशाही ताब्यात घेऊन पूर्ण करणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो झोपडीधारकांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या मंदावलेल्या कारभारालादेखील गती मिळण्यास मदत होणार आहे.
रखडलेले प्रकल्प मिळावेत यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या अधिकाऱयांनी अलीकडेच एसआरएला प्रस्ताव दिला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात काही प्रकल्प देण्याचा निर्णय एसआरएने घेतला आहे. याशिवाय आणखी काही नवीन एसआरए प्रकल्प घेण्याच्या हालचाली शिवशाहीकडून सुरू आहेत. याबाबत शिवशाहीच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही रखडलेले एसआरए प्रकल्प शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मिळावेत म्हणून एसआरएला प्रस्ताव दिला होता. यासंदर्भात नुकतीच एसआरएच्या वरिष्ठ अधिकाऱयांसोबत आमची सकारात्मक बैठक झाली. विकासकाने प्रकल्प अद्याप पूर्ण का केला नाही? कायदेशीर अडचणी आहेत का याचा आधी आम्ही अभ्यास करू. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात करू, असेही अधिकाऱयाने सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List