IND vs AUS हिंदुस्थानचा लाजिरवाणा पराभव, अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे सपशेल लोटांगण
एका पेक्षा एक जबरदस्त फलंदाज असलेली टीम इंडियाच्या फलंदाजांनी अॅडलेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर सपशेल लोटांगण घातले. अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघे 18 धावांचे लाजिरवाणे लक्ष्य टीम इंडियाने दिले होते. ते लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज गाठत टीम इंडियाचा दणदणीत पराभव केला.
अॅडलेड कसोटीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कच्या स्मार्ट गोलंदाजीपुढे टीम इंडियाचे दिग्गज अवघ्या 180 धावात ढेपाळले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने 337 धावा करत 157 धावांची आघाडी घेतली. टीम इंडिया फलंदाजीला उतरल्यानंतर त्यांना ही धावसंख्या गाठून ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी एक भक्कम धावसंख्या ठेवण्याचे आव्हान होते. मात्र पुन्हा एकदा टीम इंडियाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियापुढे आपले गुडघे टेकले व संपूर्ण संघ 175 वर बाद झाला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी लाजिरवाणे असे 19 धावांचे लक्ष्य दिले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List