‘एक है तो सेफ हैं…’, नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा राहुल गांधी यांनी असा बनवला अर्थ

‘एक है तो सेफ हैं…’, नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा राहुल गांधी यांनी असा बनवला अर्थ

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचारासाठी आले आहेत. प्रचार सभेत ते महायुती आणि नरेंद्र मोदी यांच्यवर हल्ला करत आहे. त्याचवेळी सोमवारी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है तो सेफ हैं…’ या घोषणेचा नवीन अर्थ सांगितला. यावेळी त्यांनी गौतम अदानी यांच्यावर जोरदार हल्ला केला.

राहुल गांधी यांचे हे प्रश्न

‘एक है तो सेफ हैं…’ म्हणजे नरेंद्र मोदीजी आहेत. अमित शाह आहे. गौतम अदानी सेफ आहेत. नुकसान कोणाचे होणार आहे तर धारावीचे होणार आहे. महाराष्ट्रातील जनतेचे होणार आहे. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी अगदी बरोबर घोषणा दिली आहे. एक कोण आहे…तर अदानी आहे. सेफ कोण आहे तर अदानी आहे. ही घोषणा गौतम अदानी यांच्यासाठी आहे. संपूर्ण काम एका व्यक्तीच्या मदतीसाठी आहे.

सर्व प्रशासकीय यंत्रणा त्या एका व्यक्तीसाठी कामाला लावली आहे. त्याच व्यक्तीला देशाचे एअरपोर्ट दिले जात आहे. त्याच व्यक्तीला देशाची संरक्षण उत्पादन दिले जात आहे. त्यांनाच धारावी दिले गेले आहे. कारण नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे जुने नाते आहे. एका अब्जाधीश यांना १ लाख कोटींचा फायदा देण्यासाठी ही सगळी खटाटोप सुरू आहे.महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्रातील जनतेला मिळणार की एका व्यक्तीला मिळणार? हा या निवडणुकीचा मुद्दा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

काँग्रेस काय करणार

आमचा फोकस महिलांना मदत करण्यावर आहे. महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहे. महिलांना बस प्रवास मोफत होणार आहे. शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज माफ करणार आहे. जातीय जनगणना आम्ही करणार आहे. आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा आम्ही उठवणार आहे. महागाई, बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा आहे. २५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा देणार आहे. बेरोजगार युवकांना चार हजार रुपये महिन्याला देणार आहे, असे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘एक है तो सेफ हैं…’, नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा राहुल गांधी यांनी असा बनवला अर्थ ‘एक है तो सेफ हैं…’, नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा राहुल गांधी यांनी असा बनवला अर्थ
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचारासाठी आले आहेत. प्रचार सभेत ते महायुती आणि नरेंद्र मोदी यांच्यवर हल्ला करत...
वेश्यांचे वंशज.. प्रसिद्ध अभिनेत्रीचं वादग्रस्त वक्तव्य; अखेर तुरुंगात रवानगी
“पुष्पा कभी झुकेगा नहीं, पर पहली बार..”; तुंबड गर्दीसमोर अल्लू अर्जुन नतमस्तक
मुंबई, दिल्ली नव्हे थेट बिहारमध्ये ‘पुष्पा 2’ चा ट्रेलर लाँच, अल्लू अर्जुनचं बिहार कनेक्शन काय?
नवऱ्याने फसवणूक केल्यानंतर कपूर कुटुंबाची सून म्हणते, ‘संसार केला फक्त मुलांसाठी कारण…’
Pushpa 2: ‘पुष्पा 2’च्या ट्रेलर लाँचदरम्यान रेकॉर्डब्रेक गर्दी; पोलिसांकडून लाठीचार्ज अन्..
पुष्पा म्हणजे ब्रँड, ट्रेलर लाँचवेळी श्रीवल्लीचं वक्तव्य चर्चेत..