मोठी बातमी! राज ठाकरेंनी भेट नाकारली, सदा सरवणकर इरेला पेटले; म्हणाले, आता लढायचंच…

मोठी बातमी! राज ठाकरेंनी भेट नाकारली, सदा सरवणकर इरेला पेटले; म्हणाले, आता लढायचंच…

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आता माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. सदा सरवणकर यांनी अखेर आपला निर्णय जाहीर केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही मिनिटं बाकी असताना सदा सरवणकर यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून यावेळी पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित ठाकरे यांच्यासाठी सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते, मात्र सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

दरम्यान सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी आज शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांची भेट नाकारली. मला यावर आता काहीही बोलायचं नाही, तुम्हाला उभं राहिचं तर राहा. नसेल राहिचं तर राहू नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावर प्रतिक्रिया देताना सदा सरवणकर यांनी म्हटलं की, मी माझ्या मनाची तयारी केली होती. मात्र राज ठाकरे हे भेटायलाच तयार नसल्यानं माझा नाईलाज आहे. त्यामुळे आता मी ही निवडणूक लढणार आहे, असं सरवणकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान सरवणकर यांनी आज  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. माहीम मतदारसंघातील स्थिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना समजावून सांगताना, मी जरी माघार घेतली तरी अमित ठाकरे निवडून येतील अशी परिस्थिती नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीची देखील इच्छा व्यक्त केली होती. मात्र राज ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारली. त्यामुळे आता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय सरवणकर यांनी घेतला आहे. त्यामुळे माहीममध्ये आता तिरंगी लढत होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Raj Thackeray : ‘हा पडेल, तो पडेल, चालू राहतं, पण…’, शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले Raj Thackeray : ‘हा पडेल, तो पडेल, चालू राहतं, पण…’, शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले
“आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न खोळंबलेले आहेत. महाराष्ट्रात अनेक लोकांना भेटलो. अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रातील आहे. चालायला फुटपाथ मिळत नाही, गाडी...
उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
‘फायर नहीं, वाइल्ड फायर…’, पुष्पा चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस
खड्ड्यात जा.. म्हणणाऱ्या अश्नीरची सलमानने घेतली शाळा; म्हणाला “स्वत: हिरो बनण्याचा..”
जिभेची चव बदलली? ‘हा’ आजार तर नाही ना !
तुम्हीही हे 6 पदार्थ खाता? सोडा बरं, नाही तर अकाली म्हातारे व्हाल!
Kashmera Shah Accident – कश्मीरा शाहचा भीषण अपघात, फोटो शेअर करत दिली माहिती