‘धर्मयुद्ध’ शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘महाभारत’; ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं आव्हान

‘धर्मयुद्ध’ शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘महाभारत’; ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं आव्हान

महाविकास आघाडी मतांचं ‘वोट जिहाद’ करतंय. आपल्याला रामराज्य आणायचं असल्यास ‘धर्मयुद्ध’ करावंच लागेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या सभेत म्हटलं. फडणवीसांच्या या विधानानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर आक्षेप घेतला. धर्मयुद्ध म्हणून फडणवीस दंगलींना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता आज tv9 मराठीच्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या विधानाला उत्तर दिलं आहे. सज्जाद नोमानी यांच्या विधानावरून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे यांनी ‘धर्मयुद्ध’ शब्दावर आक्षेप घ्यावा. मी त्यांना खुलं आव्हान देतो. उद्धव ठाकरेजी, माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. माझ्या ‘धर्मयुद्ध’ शब्दावर तुम्ही आक्षेप घ्या. मला माहिती आहे. तुम्हाला ‘जिहाद’ शब्द आवडतो. तुम्हाला ‘धर्मयुद्ध’ शब्द आजकाल आवडत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

सज्जाद नोमानींनी दंगलींमधील मुस्लीम लोकांवरचे खटले मागे घ्यायला सांगितलं. त्यांनी सांगितलं जे भाजपला मदत करतात त्यांना सोशल बायकॉट करा. या दंगली नाहीयेत? यावर उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? कारण आता ते हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र राहिलेले नाहीत. ते जनाब बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र झालेले आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवी यांनी निशाणा साधला आहे. सज्जाद नोमानीचं पाय चाटणं जे सुरु आहे. त्याला आमचा विरोध आहे, असं फडणवीस म्हणालेत.

सज्जाद नोमानी यांच्या विधानावर आक्षेप

लोकसभेसारखं विधानसभेला देखील अल्पसंख्याकांमध्ये जिहाद हा शब्द वापरून, धार्मिक नेत्यांचा वापर करून मशीदींचा वापर करून हे पुन्हा एकदा मतांचं ध्रुवीकरण करत आहेत. अशावेळी आमचं कर्तव्य आहे की इतरांना आम्ही सजग केलं पाहिजे. कारण मूठभर लोकांचे चोचले पुरवून एखादं सरकार निवडून आलं. तर ते सरकार त्यांच्या करताच काम करेल. त्यांच्याच इशाऱ्यावर नाचेल, असं म्हणत सज्जाद नोमानी यांच्या विधानाचा दाखला देत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘एक है तो सेफ हैं…’, नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा राहुल गांधी यांनी असा बनवला अर्थ ‘एक है तो सेफ हैं…’, नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा राहुल गांधी यांनी असा बनवला अर्थ
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचारासाठी आले आहेत. प्रचार सभेत ते महायुती आणि नरेंद्र मोदी यांच्यवर हल्ला करत...
वेश्यांचे वंशज.. प्रसिद्ध अभिनेत्रीचं वादग्रस्त वक्तव्य; अखेर तुरुंगात रवानगी
“पुष्पा कभी झुकेगा नहीं, पर पहली बार..”; तुंबड गर्दीसमोर अल्लू अर्जुन नतमस्तक
मुंबई, दिल्ली नव्हे थेट बिहारमध्ये ‘पुष्पा 2’ चा ट्रेलर लाँच, अल्लू अर्जुनचं बिहार कनेक्शन काय?
नवऱ्याने फसवणूक केल्यानंतर कपूर कुटुंबाची सून म्हणते, ‘संसार केला फक्त मुलांसाठी कारण…’
Pushpa 2: ‘पुष्पा 2’च्या ट्रेलर लाँचदरम्यान रेकॉर्डब्रेक गर्दी; पोलिसांकडून लाठीचार्ज अन्..
पुष्पा म्हणजे ब्रँड, ट्रेलर लाँचवेळी श्रीवल्लीचं वक्तव्य चर्चेत..