“निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय…”, रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

“निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय…”, रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar On Rashmi Shukla : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता नुकतंच शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे नेते उपस्थित होते. या बैठकीत मनोज जरांगे पाटील, रश्मी शुक्ला यांसह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगांनेही चर्चा झाली. यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवारांनी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यावरुन भाष्य केले.

रश्मी शुक्लांची बदली

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी यांनी रश्मी शुक्ला यांची बदली करावी, अशी मागणी केली होती. या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली आहे. यावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया दिली.

शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया काय?

“निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य आहे. ज्या व्यक्तीचा कालखंड संपलेला आहे, त्याबद्दल जाहीरपणे अनेक लोक बोलतात. सत्तेच्या गैरवापराबद्दल, त्यांना एक्स्टेंशन देऊन त्यांच्या कालखंडात निर्णय घेण्याचा प्रयत्न होता. त्यावर निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला. आता त्या कोणत्याही पदावर असू नये”, असे शरद पवार म्हणाले.

“मनोज जरांगे आणि आघाडीचा काहीही संबंध नाही”

मनोज जरांगे आणि आघाडीचा काहीही संबंध नाही. हा निर्णय त्यांचा आहे. मला आनंद आहे, त्यांनी हा निर्णय घेतला. भाजपला आमचा विरोध आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी उमेदवार ठेवले असते तर त्याचा फायदा भाजपला झाला असता. या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय योग्य आहे, असे शरद पवारांनी म्हटले.

काँग्रेसकडून बंडखोरी थांबवण्याचे प्रयत्न सुरु

यानंतर शरद पवारांना बंडखोर उमेदवारांबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले, ज्या प्रकारे आम्ही दोघांनी प्रयत्न केले तसं काँग्रेसही प्रयत्न करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Raj Thackeray : ‘हा पडेल, तो पडेल, चालू राहतं, पण…’, शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले Raj Thackeray : ‘हा पडेल, तो पडेल, चालू राहतं, पण…’, शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले
“आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न खोळंबलेले आहेत. महाराष्ट्रात अनेक लोकांना भेटलो. अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रातील आहे. चालायला फुटपाथ मिळत नाही, गाडी...
उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
‘फायर नहीं, वाइल्ड फायर…’, पुष्पा चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस
खड्ड्यात जा.. म्हणणाऱ्या अश्नीरची सलमानने घेतली शाळा; म्हणाला “स्वत: हिरो बनण्याचा..”
जिभेची चव बदलली? ‘हा’ आजार तर नाही ना !
तुम्हीही हे 6 पदार्थ खाता? सोडा बरं, नाही तर अकाली म्हातारे व्हाल!
Kashmera Shah Accident – कश्मीरा शाहचा भीषण अपघात, फोटो शेअर करत दिली माहिती