हा विकास नव्हे तर विनाश, महाराष्ट्राचा जीडीपी घसरल्यावरून जितेंद्र आव्हाड यांची टीका
गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राची आर्थिक घसरण झाल्याचे वृत्त एका मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्यावरून हा विकास नव्हे तर हा विनाश अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
एक्सवर पोस्ट करून आव्हाड यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उध्वस्त करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही..!
राज्याचा जीडीपी वाटा दशकभरात 15 टक्क्यांवरून 13 पर्यंत घसरला. हा ‘विकास’ नाही, तर ‘विनाश’ आहे. उद्योगांचे थडगे, गुंतवणुकीवर गदा, बेरोजगारीचा आतंक राज्यात माजवला आहे. भाजपाच्या खोट्या विकासाचा पोस्टर फाटला असून आता महाराष्ट्राच्या जनतेला फक्त 20 नोव्हेंबरची प्रतीक्षा आहे असेही आव्हाड म्हणाले.
महाराष्ट्राती अर्थव्यवस्था उध्वस्त करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही..!
राज्याचा जीडीपी वाटा दशकभरात १५ टक्क्यांवरून १३ पर्यंत घसरला. हा ‘विकास’ नाही, तर ‘विनाश’ आहे. उद्योगांचे थडगे, गुंतवणुकीवर गदा, बेरोजगारीचा आतंक राज्यात माजवला आहे. भाजपाच्या खोट्या विकासाचा पोस्टर फाटला असून… pic.twitter.com/aRYOY23ptN
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 3, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List