‘…तेव्हा सर्वात आधी गाडी घेऊन जाणारा मी होतो, मी कुटुंबात कधी…’, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

‘…तेव्हा सर्वात आधी गाडी घेऊन जाणारा मी होतो, मी कुटुंबात कधी…’, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाऊ उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. राज ठाकरे यांची दादर माहीम मतदारसंघात मनसे नेते अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी कुटुंबातील काही घटनांचा उल्लेख करत उद्विग्नता व्यक्त केली. “तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी उद्धव आजारी पडला त्यावेळी मी पहिल्यांदा गाडी घेऊन गेलो. मी कुटुंबाच्या आड कधी राजकारण आणत नाही. गेल्यावेळी आदित्य उभा होता. तेव्हा मी मनाने उमेदवार नाही दिला. तिथे ३८ हजार मतं आहेत”, अशी भावना राज ठाकरे यांनी भर प्रचारसभेत बोलून दाखवली. “लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा मनात पण नव्हते अमित निवडणुकीला उभा राहणार. माझ्या काय त्याच्याही मनात नसेल. जे समोर येतील त्यांच्याशी लढू, निवडून नक्की आणणार”, असंदेखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“नेत्यांची आणि सरचिटणीसची बैठक झाली, तेव्हा अमित बोलला की सर्व नेत्यांनी उभं राहील पाहिजे, मी पण उभा राहीन. आम्ही पण बैठक घेतली, त्यात त्याला विचारलं उभा राहणार आहेस? तो बोलला तू सांगशील तर राहीन. आज अमितच्या विरोधात जी माणसं उभी आहेत त्यांची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढू शकतो. मात्र त्या घाणीत मला हात नाही घालायचा. तुमच्या हाकेला २४ तास ओ देणारी माणसे हवीत”, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांचं नागरिकांना आवाहन

“अमित राज ठाकरे असे जरी नाव असले तरी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही. मी आज प्रभादेवीमध्ये आलो आहे. तुमची अपेक्षा असेल की समोरच्या उमेदवारबद्दल बोलवं. पण ज्याचे काहीच नाही त्याच्यावर काय बोलावं? मी बाळासाहेबांना सांगून गेलो, बाळासाहेब सोडून मी कुणाच्याही हाताखाली काम करू शकत नाही”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. “मी हे स्वप्न खुर्चीसाठी नाही पाहत. ज्या महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली, पोटामध्ये आग असलेली माणसे मी तुमच्यासाठी आणतो आहे. अमितला, संदीपला आणि महाराष्ट्रमध्ये जिथे जिथे माझे उमेदवार उभे तिथे तिथे त्यांना निवडून द्या”, असं राज ठाकरे यांनी आवाहन केलं.

राज ठाकरेंकडून जुन्या आठवणींना उजाळा

“सहसा मी जी गोष्ट कधीच करत नाही ती मी आज केली. या सभेला येण्यासाठी मी सिग्नल तोडत आलो. आधीच निवडणूक आयोगाने कमी दिवस दिले, मुंबईमध्ये सगळीकडे पोहोचणे अवघड आहे. तेव्हा महाराष्ट्रात कसं पोहोचणार? ‘सामना’कडे येताना मला सर्व फ्लॅशबॅक येत होते. सर्व जुना काळ समोर येत होता. पहिले साप्ताहिक काढले. बाळासाहेबांनी आणि माझ्या वडिलांनी तो मार्मिक, तो इथल्या प्रभादेवीच्या प्रेसमधून, इथूनच सामना निर्माण झाला. पहिले पाक्षिक सुरू केले त्याचे नाव होते प्रबोधन. प्रबोधनमुळे माझ्या आजोबांना प्रबोधनकार म्हणून ओळखले गेले”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“दादरमध्ये साप्ताहिक सुरू झाले होते. माराठामध्ये बाळासाहेब व्यंगचित्र करत आणि नवयुगमध्ये माझे वडील व्यंगचित्र करत. हे सुरू असताना पुन्हा मार्मिक सुरू झाले, मराठी माणसावर जो अन्याय होत होता, तो त्यात आला, त्यात होतं वाचा आणि थंड बसा. मात्र नंतर आले की वाचा आणि पेटून उठा. जे भाषण सुरू झाले तेव्हा त्याला स्वरूप द्यायचे की नाही, बाळासाहेब म्हणाले की द्यायचे आहे पण कल्पना नाही. त्याला नाव काय द्यायचे यावर चर्चा झाली. आजोबांनी सांगितले शिवसेना”, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.

“मी मार्मिकमध्ये व्यंगचित्रला सुरुवात केली. १९८५ साली बाळासाहेबांनी व्यंगचित्र करणे बंद केले. त्यानंतर जबाबदारी माझ्यावर आली. लोकसत्ता, सामनामध्ये देखील माझे व्यंगचित्र चालू झाली. हे सगळे सांगायचं विचार का आला? तर याची सुरुवात केली प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांनी. शिवसेनेची स्थापना दादरमध्ये झाली. अनेक आमदार झाले, ठाकरेंचा प्रवास दादर, प्रभादेवी, माहीममध्ये झाला”, असं राज ठाकरे म्हणाले.

“जे आधी घडले नाही ते आता घडतंय. आज दादर माहीम मतदारसंघात पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय. आज अमितसाठी माझी ही एकच सभा आहे. प्रत्येकासाठी मी सभा घेतोय. हा सगळा इतिहास जेव्हा मी बघतो, त्यानंतर २००६ ला मी शिवसेनेतून बाहेर आलो. मी तेव्हा म्हटलं होतं, माझा वाद विठ्ठलाशी नाही, बडव्यांशी आहे. त्यावेळी ३७-३८ आमदार आले होते, ७-८ खासदार आले होते, म्हणाले की जाऊ दुसऱ्या पक्षात. मी तेव्हा म्हटलं की, माझा वाद बाळासाहेबांशी नाही. त्यांना जेव्हा कळलं मी जाणार, तेव्हा त्यांनी मला मिठी मारली होती. मला पक्ष फोडायचा नव्हता, माझ्यात ताकद असेल तर मी माझा पक्ष काढेन”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे का? भाजपा आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे का? भाजपा आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ
राज्यात निवडणुकीला रंग चढला आहे. प्रचाराच्या तोफा आता थोड्याच दिवसात थंडावतील. त्यापूर्वी आमदार, नेते आणि कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रचार करत...
निवडणुकीच्या धामधुमीत कॉमनमॅनच्या भावनांना साजेसं रॅप साँग; तरुणांकडून भरभरून प्रतिसाद
‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजेवर संकट; लीला यातून कसा काढणार मार्ग?
“ब्रेकअपनंतर सिंघम अगेनच्या सेटवर अर्जुनची अवस्था…”; रोहित शेट्टीकडून खुलासा
“त्यांना गमावल्यानंतर..”; वडिलांच्या आत्महत्येबद्दल पहिल्यांदाच मलायका अरोरा व्यक्त
मतदान करणाऱ्यास पेट्रोल फ्री मिळणार
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ, व्हीव्हीआयपी रांगेत तरुणाची घोषणाबाजी; सुरक्षारक्षकांची धावपळ