शेअर बाजाराची घसरगुंडी सुरूच; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शेअर बाजारात तेडी दिसून आली होती. त्यानंतर बाजारात घसरण सुरूच आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी देशातील शेअर बाजारातील त्यांच्या समभागांची विक्री केल्यानं घसरणीचं सत्र सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात विदेश गुंतवणूकदारांनी देशातील शेअर बाजारातून 1.50 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. त्यामुळे बाजाराची घसरण सुरू आहे. त्यामुळे देशातील गुंतवणूकदारांचे 6 लाखा कोटी रुपये बुडाले आहेत.
शेअर बाजारात गेल्या आठवड्यात सुरू झालेले घसरणीचं सत्र काही थांबत नसल्याचं चित्र आहे. शेअर बाजार मंगळवारी सकाळी तेजीत सुरू झाला होता. मात्र, दिवसभरातील व्यवहारादरम्यान बँकिंग, एफएमसीजी, ऑटो आणि एनर्जी क्षेत्रातील शेअर्सची जोरदार विक्री झाली. त्यामुळं शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 79 हजारांच्या घाली घसरला तर निफ्टी 24 हजारांच्या खाली आला. शेअर बाजार बंद झाला तेव्हा 821 अंकांच्या घसरणीसह मुंबई बाजाराच निर्देशांक 78675 वर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 257 अंकांच्या घसरणीसह 23883 अंकावर बंद झाला.
शेअर बाजाराची घसरगुंडी सुरू असल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. मंगळवारच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे 5.95 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. शेअर बाजारामध्ये सर्वाधिक घसरण बँकिंग, एफएमसीजी, ऑटो, फार्मा, मेटल्स, एनर्जी, हेल्थकेअर, ऑईल आणि गॅस या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये झाली. तर आयटी आणि रिअल इस्टेटच्या शेअरमधअये किरकोळ तेजी होती. निफ्टी मिडकॅफ आणि निफ्टी स्मॉलकॅपमध्येही मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअरबाजारातील 30 पैकी केवळ 4 कंपन्या तेजीत होत्या. तर 26 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. रिलायन्स, ब्रिटानिया, HUL, टाटा मोटर्स, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List