मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि मनसे सत्तेत असणार, राज ठाकरे यांचं मोठं भाकीत

मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि मनसे सत्तेत असणार, राज ठाकरे यांचं मोठं भाकीत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांबाबत मोठं भाकीत केलं आहे. महायुती विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढत असली तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यात आलेला नाही. जर महायुतीची राज्यात सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत राज्यातील मतदारांना देखील प्रश्न पडला आहे. सध्या जरी कोणाचंही नाव चर्चेत असलं तरी राज ठाकरे यांनी याबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे.  राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलंय की, 2024 चा मुख्यमंत्री भाजपचाच होईल. तर 2029 चा मुख्यमंत्री हा मनसेचा होईल. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

राज ठाकरे यांचं मोठं भाकीत

विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत आहे, तर तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत. मनसेनं 100 पेक्षा अधिक जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे मनसेच्या किती जागा येतात याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागून आहे. यातच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र व्हिजन या कार्यक्रमात बोलताना यंदा 2024 चा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तर 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा असेल, असे मोठं वक्तव्य केले आहे. निवडणूक निकालाआधी राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्यात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्टेटला राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे २०२४ चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आणि 2029 मध्ये राज ठाकरे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगू लागली आहे. तसेच यंदाचा मुख्यमंत्री हा मनसेच्या पाठिंब्यावरच होणार असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे.

भाजप मॅच्युअर्ड पक्ष – राज ठाकरे

अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने आणि ठाकरे गटाने देखील आपल्या उमेदवार दिला आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, अमित विरोधात उमेदवार देणे हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग आहे. प्रत्येकजण स्वभावानुसार वागतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळू शकते पण सगळ्यांनाच हे कळेल असे नाही. इतरांचे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असे ही राज ठाकरे म्हणाले.

मी पक्ष फोडला नाही – राज ठाकरे

शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्याने त्यावर ही राज ठाकरे यांनी वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, मी शिवसेनेतून बाहेर पडलो, मी पक्ष फोडला नाही. मला पक्ष फोडून पक्ष निर्माण करायचा नव्हता.  वेळ लागला तरी चालेल. तेव्हा शक्य असूनही मी आमदार फोडले नाहीत. सत्तेत येण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल. फोडाफोडी करुन मवा सत्ता नको. पण महाराष्ट्र आताच्या परिस्थितीतून बाहेर येईल. महाराष्ट्र खूप मोठा आहे. असे ही राज ठाकरे म्हणालेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘वोट जिहाद’ प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर पोलिसांची धडक कारवाई ‘वोट जिहाद’ प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर पोलिसांची धडक कारवाई
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक मुद्दे आणि गुद्दे समोर येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या निवडणुकीत वोट जिहाद होत...
पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्यानंतर सिद्धूंना सोडावा लागला कपिलचा शो; आता म्हणाले “सरदारच पाहिजे..”
“तुम्ही ज्या सूरजवर प्रेम केलंत, तो बाहेर आल्यावर तसा नाही..”; वादावर काय म्हणाली अंकिता?
जुही चावलाची वादग्रस्त पोस्ट, ‘एखाद्या गटारात राहतोय असं…’, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
अमित ठाकरे यांना का मतदान करावं? मराठी अभिनेत्याने दिली 10 कारणं
कपूर, खान नाही तर बॉलिवूडमधील ‘हे’ कुटुंब सर्वांत श्रीमंत; तब्बल 10 हजार कोटींची संपत्ती, एकेकाळी विकायचे फळं
भाजपची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ घोषणा पोकळ; काँग्रेसच्या आराधना मिश्रा यांची टीका