कोथरुडमध्ये दोन चंद्रकांत यांच्यात टक्कर, मनसे फॅक्टर कोणाला फायदेशीर ?

कोथरुडमध्ये दोन चंद्रकांत यांच्यात टक्कर, मनसे फॅक्टर कोणाला फायदेशीर ?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांची तयारी जोमाने सुरु आहे. जागा वाटपाचा तिढा सुटता-सुटता नाकीनऊ आले आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर रोजी होती. आता 4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे.येत्या 20 नोव्हेंबरला मतदान आहे तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. पुण्यातील कोथरुड विधानसभेत काय स्थिती आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत.

कोथरुड विधानसभा – 2014

उमेदवाराचे नाव पक्षएकूण मतेटक्केवारी शेअर
कुलकर्णी मेधा विश्राम भाजपा1,00,94151.15%
चंद्रकांत बालभिम मोकाटेशिवसेना36,27918.38%
बाबुराव दत्तोबो चंदेरे राष्ट्रवादी कॉंग्रेस28,17914.28%

कोथरुड विधानसभा मतदार संघ पुणे जिल्ह्यात येतो. साल 2008 मतदार संघाच्या फेररचनेनुसार तयार झालेला आहे. कोथरुड विधानसभा मतदार संघात पुणे महानगर पालिकेचे वॉर्ड क्रमांक 43 पासून 58, 161 आणि 162 सामील आहेत. कोथरुड विधानसभा क्षेत्र पुणे लोकसभा मतदार संघात येतो. भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत ( दादा ) बच्चू पाटील येथील विद्यमान आमदार आहेत. या मतदार संघातून साल 2009 मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांचा विजय झाला होता. त्यानंतर मात्र या मतदार संघात सलग दोन टर्म भाजपाचे आमदार निवडून येत आहे. साल 2019 च्या निवडणूकात येथून चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला होता.

कोथरुड विधानसभा – 2019

उमेदवाराचे नावपक्षएकूण मतेटक्केवारी शेअर
चंद्रकांत (दादा) बचू पाटीलभाजपा1,05,24653.93 %
किशोर नाना शिंदेमनसे79,75140.87 %
नोटाइतर4,0282.06 %

जातीय समीकरण काय ?

कोथरुड विधानसभा मतदार संघ हा खुला जनरल वर्गवारीचा मतदार संघ आहे.साल 2019 च्या आकड्यांनुसार येथे एकूण 3 लाख 90 हजार 458 मतदार आहेत.या मतदार संघात एससी – एसटी मतदारांची संख्या महत्वाची आहे. येथील एससी आणि एसटी मतदारांची संख्या 37 हजाराच्या आसपास आहे. तर येथे मुस्लीमांची लोकसख्या 9 हजाराच्या आसपास आहे.महायुतीने कोथरुड येथून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. सध्या चंद्रकांत पाटील सत्तेत मंत्री आहेत. भाजपाने त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे.महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे येथून उमदेवार म्हणून उभे राहीले आहेत.

मनसे फॅक्टर  कोणाला फायदेशीर

कोथरुड हा मतदार संघ हायप्रोफाईल गणला जात आहे. भाजपाचे चंद्रकांत पाटील येथून उभे आहेत. ते सरकारमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत. येथे भाजपाचे दोन खासदार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि दुसऱ्या खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी आहेत. येथे भाजपाचे अनेक नगरसेवक आहेत. दुसऱ्याबाजूला दहा वर्षांपूर्वी आमदार म्हणून निवडून आलेल्या चंद्रकांत मोकोटे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिलेली आहे. साल 2019 च्या निवडणूकीत चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय उमेदवार होऊन 80 हजार मते मिळविणारे किशोर शिंदे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे येथे तिरंगी सामना होणार आहे. यात शिंदे यांनी गेल्यावेळी घेतलेली मते घेतली तरी मोकाटे अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाही घेतली तर पाटील अडचणीत येतील आणि दोघांत मतांची विभागणी झाली तर पाटील निवडून येथील असे येथील चित्र आहे. यातून पाटील यांचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसे फॅक्टर येथे कोणाला फायदेशीर ठरणार याकडे लक्ष लागले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘वोट जिहाद’ प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर पोलिसांची धडक कारवाई ‘वोट जिहाद’ प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर पोलिसांची धडक कारवाई
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक मुद्दे आणि गुद्दे समोर येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या निवडणुकीत वोट जिहाद होत...
पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्यानंतर सिद्धूंना सोडावा लागला कपिलचा शो; आता म्हणाले “सरदारच पाहिजे..”
“तुम्ही ज्या सूरजवर प्रेम केलंत, तो बाहेर आल्यावर तसा नाही..”; वादावर काय म्हणाली अंकिता?
जुही चावलाची वादग्रस्त पोस्ट, ‘एखाद्या गटारात राहतोय असं…’, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
अमित ठाकरे यांना का मतदान करावं? मराठी अभिनेत्याने दिली 10 कारणं
कपूर, खान नाही तर बॉलिवूडमधील ‘हे’ कुटुंब सर्वांत श्रीमंत; तब्बल 10 हजार कोटींची संपत्ती, एकेकाळी विकायचे फळं
भाजपची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ घोषणा पोकळ; काँग्रेसच्या आराधना मिश्रा यांची टीका